मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांच्या कामाबद्दल नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला, आमदार आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात काल बाचाबाची झाल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट बार्शीटाकळी पोलिसात धाव घेवून आमदार यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली.
काल बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गडावर दर्शनासाठी गेले असता हा प्रकार घडला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार पिंपळे यांना घेराव घालत रस्त्याचे काम का करीत नाही, आमदार कशासाठी निवडून दिले ? अशा कडक शब्दात लोकांनी प्रश्नांचा भडिमार केला. या मध्ये आमदार पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न करणाऱ्या कार्यकर्त्याला ढकलून दिले. यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी तेथून काढता पाय घेतला.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे रविवारी बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गडावर देवीच्या दर्शनासाठी आले असता, बार्शीटाकळी युवासेना उपशहर प्रमुख रुद्राक्ष राठोड या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने आमदार पिंपळे दिसताच प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावेळी आमदार पिंपळे यांच्या सोबत दोघांत शाब्दिक चकमक सुरु असतात आमदार पिंपळे यांच्या कार्यकर्तेही आक्रमक झाले असल्याने शिवसेना कार्यकर्त्याला ढकलून लावले आणि शिवीगाळही करण्यात आली असल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांचा म्हणणे आहे.
बार्शीटाकळी भागात रस्ते चांगले नाहीत, आमदार लक्ष देत नाही, रस्ते का करीत नाही म्हणून लोकांनी जाब विचारत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मतदार विरुद्ध आमदार असा सामना रंगला होता. आम्ही तुम्हाला आमदार म्हणून कशासाठी निवडून दिले ? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला,धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. आमदार पिंपळे हे निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत शिवसेना कार्यकर्ते यांनी आमदारांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रारही बार्शीटाकळी पोलिसात करण्यात आली. याबाबत सोशल मीडियावर सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.