सांगली – ज्योती मोरे
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व कोल्हापूर क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुंदवाड येथे हरकुलस जीम व फिटनेस सेंटर येथे आयोजित केलेल्या शालेय विभागीय स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धे साठी 17 19 वयोगटातील मुला मुलींच्या स्पर्धा ह्या दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदर स्पर्धेमध्ये अनुज रवींद्र पाटील नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम इयत्ता दहावी मध्ये शिकत असून त्याने प्लस 102 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेस निवड झाली त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नव कृष्णा व्हॅली स्कूल मार्फत वेटलिफ्टिंग खेळ प्रकारचे सकाळी व सायंकाळी या दोन वेळेमध्ये स्वतंत्र असे वेटलिफ्टिंग चे प्रशिक्षण देण्यात येत असते त्याला प्रशिक्षक म्हणून विनायक जोशी राष्ट्रीय वेटलिफ्टर व एन आय एस कोच यांचे मार्गदर्शन लाभत असून संस्थेचे मा प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सुरज फाउंडेशन फाउंडेशन डॉक्टर यशवंत तोरो चेअरमन नव कृष्णा व्हॅली स्कूल कमिटी.मा एन जी कामत प्राचार्य संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण व क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन लाभले.