आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ येणार असल्याचे मत काही क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले आहे. काल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. पहिला सामना पाच गडी राखून गमावलेल्या पाकिस्तानी संघाने हा सामना ५ विकेटने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पाच विकेट्स राखून आणि एक चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. त्यामुळे आता पाकिस्तानचा फायनलचा मार्ग निश्चित झाला आहे. सोबतच भारतालाही फायनल मध्ये येण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी भारताला येणाऱ्या दोन्हीही सामन्यात विजय मिळवावा लागेल.
सुपर-४ मध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी ३-३ सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत भारताच्या पराभवानंतर फायनल गाठण्याचे समीकरण पुढीलप्रमाणे असेल.
टीम इंडियाचा सुपर ४ मधील दुसरा सामना ६ सप्टेंबरला श्रीलंकेशी तर शेवटचा सामना ८ सप्टेंबरला अफगाणिस्तानशी होणार आहे. जर भारताने दोन्ही सामने जिंकले तर ते फायनलच्या शर्यतीत राहतील.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत जर श्रीलंका भारताकडून हरला आणि पाकिस्तानविरुद्ध जिंकला तर त्यांचेही ४-४ गुण होतील. तसेच, जर पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव केल्यास तिन्ही संघांचे ४-४ गुण होतील. अशा स्थितीत नेट रनरेटच्या आधारे टॉप-२ संघ ठरवले जातील.
पाकिस्तानने उर्वरित सामने जिंकणे भारतासाठी महत्वाचे
मात्र, पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावेत अशी टीम इंडियाची आणि भारतीय चाहत्यांची इच्छा असेल. या स्थितीत टीम इंडियादेखील आपले दोन्ही सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल. असे झाले तर पाकिस्ताचे ६, भारताचे ४ श्रीलंकेचे २ आणि अफगाणिस्तानचे शून्य गुण असतील. भारत आणि पाकिस्तान फायनल खेळतील. मात्र, तसे झाले नाहीत नेट रनरेटचा आधार घ्यावा लागेल.
पाकिस्तानच्या संघाने त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानला पराभूत केले तर ते अंतिम फेरीत पोहोचतील. दुसरीकडे, जर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध जिंकला आणि अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर तिन्ही संघांचे २-२ गुण होतील. अशा स्थितीत पुन्हा एकदा येथे नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. पण भारतीय संघ उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, पाकिस्तानने देखील दोन्ही सामने जिंकतील असे क्रिकेट जाणकारांना वाटत आहे.
आशिया चषकात भारतीय संघाचा रेकॉर्ड त्कृष्ट
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा रेकॉर्ड त्कृष्ट राहिला आहे. भारताने सर्वाधिक ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे श्रीलंकेने ५ तर पाकिस्तानने २ वेळा आशिया चषक जिंकला आहे. या स्पर्धेचा हा १५ वा मोसम आहे.