रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील देवलापर सर्कलमधील आदिवासी पाड्यात वसलेल्या मौजे बेलदा येथे माननीय तालुका कृषी अधिकारी, रामटेक श्री योगेश राऊत सर यांनी धान,कापुस, तुर शेत पिकाची पाहणी करून श्री सुभाषचंद्र बोस शेतकरी बचत गट यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या अवजारे बँकेची तपासणी केली व प्रक्षेत्रातील शेतकरी बांधवांना कृषी विभागात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची परिपूर्ण माहिती देण्यात आले,
तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधून येणाऱ्या रब्बी हंगामात कशा पद्धतीने पिकाचे नियोजन केले पाहिजे व क्षेत्रीय स्तरावर कृषी विभागाच्या मार्फत कसे योगदान दिले पाहिजे याबाबत हितगुज केले याचबरोबर गावातील शेतकरी बांधवांच्या वतीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग मागील काही २ वर्षात शेतकऱ्यांसाठी बांधावर जाऊन कृषी विभागाच्या विविध योजनेच्या कशा प्रकारे लाभ घेतला पाहिजे तसेच शेती पिकाचे कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल कृषी सहाय्यक यांचे आभार देखील मागितले यावेळी श्री हाटे सर कृषी अधिकारी तसेच आम्हा सर्व शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या सेवार्थ ऑन ड्युटी २४ तास या प्रवृत्तीने वागणारे व कृषी विभागाचे प्रत्येक योजनेची परिपूर्ण माहिती देणारे श्री दिनेशकुमार उईके साहेब, श्री तोडमल साहेब व श्री वळवी साहेब, कृषी सहाय्यक, श्री बंडू भाऊ पाटील तसेच गावातील प्रगतशील शेतकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.