नागपुर – शरद नागदेवे
नागपुर – वन विभागाचे सुधारित आकृतीबंधा नुसार वनक्षेत्रपाल ९९१ वनपाल ३०२५ व वनरक्षकाची ९६७७ याप्रमाणे क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे असुन यांच्यावर वनसंरक्षण व वनसंवर्धन, वन्यप्राणी व्यवस्थापनाचे कामे आहेत.
वनविभागाच्या प्रादेशिक, वन्यजिव विभाग व सामाजिक वनीकरण, वन प्रशिक्षण, कार्य आयोजना ह्या प्रमुख शाखा व यांचे स्वतंत्र राज्य स्तरीय प्रमुख असले तरी यामध्ये कार्यरत वनपरीक्षेञ अधिकारी, वनरक्षक व वनपाल यांच्या बदल्या व बढत्याचे व्यवस्थापन प्रादेशिक विभागाकडेच आहे.
वनरक्षक व वनपाल यांच्या बदल्या व बढत्या प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक/ वनसंरक्षक यांचे कार्यालया कडुन होत असते. याकरिता महाराष्ट्र राज्य बदल्याचे विनिमयन कायदा २००५ तसेच दि.०९/०४/२०१८ चे शासन निर्णयान्वये समुपदेशनाव्दारे बदली विषयक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
तसेच वन्यजीव विभागात ५० वर्ष वयोगटातील वनरक्षक व वनपाल यांच्या बदल्या करु नये. तीन वर्ष वन्यजीव विभागात सेवा पार पाडलेल्यांना प्रादेशिक वनविभागात व दोन पदावधी (सहा वर्ष) कार्यरत असलेल्यांची वन्यजिव विभाग व सामाजिक वनीकरण विभागात बदल्या कराव्यात.
याबाबत आदेश असतांना सुध्दा यानुसार कार्यवाही करण्यात येत नाही. ५० वर्ष वय व अनेक दुर्धर आजाराने ग्रस्त वनकर्मचारी कित्येक वर्षे त्याच विभागात कार्यरत असतात. तसेच काहींनी वन्यजिव व सामाजिक वनीकरण विभागात कधीच काम केले नाही.
अशा विसंगत कार्यपद्धती मुळे दरवर्षी बदली सत्रात बदल्यातील अनियमितता बाबत प्रकरणे व तक्रारी उद्भवतात. प्रशासकीय व्यवस्थेत न्याय न मिळाल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाचे , मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात मोठ्या प्रमाणात वनविभागाची प्रकरणे दाखल होतात. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
याकरिता महाराष्ट्र राज्य वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी शासन व प्रशासना कडे वनविभागातील सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत निवेदन सादर करुन चर्चा केल्या आहेत. याकरिता सातत्याने पाठपुरावा केला आहे.
महाराष्ट्र वनविभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे . नागपूर वनवृत्ता अंतर्गत भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर वनविभागासह वन्यजीव विभाग , सामाजिक वनीकरण, कार्य आयोजना, तपासणी नाके, दक्षता पथकात कार्यरत सर्व वनरक्षक व वनपाल यांच्या बदल्या वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांच्या आस्थापने कडे आहे.
दि. १६ /१०/२०२३ रोजी अजय पाटील यांनी श्रीमती ए.श्रीलक्ष्मी (भावसे ) वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांच्या समवेत वनकर्मचाऱ्यांचे तक्रार निवारण सभेत ऑनलाईन पद्धतीने बदल्या बाबत आग्रही मागणी केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद श्रीमती ए.श्रीलक्ष्मी (भावसे ) वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांनी दिला. वनकर्मचाऱ्यांचे तक्रार निवारण सभेत.
वनरक्षक व वनपाल यांचे पदोन्नती प्रकिया दि.१/८/२०२१ चे शासन निर्णयानुसार विहित कार्यपद्धती व कालमर्यादेत कार्यवाही होत नसल्याने तसेच काही वनवृत्तात पदोन्नती विलंबाने होत असल्याने वनपाल पदाचे राज्यस्तरीय सेवाजेष्ठता यादीत ते मागे पडतात. त्यामुळे पदोन्नती बाबत शासन निर्णयाप्रमाणे सर्व वृत्त स्तरावर कार्यवाही करण्याचे आश्वत केले.
राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवालास शासनाने दि.१३/०२/२०२३ चे शासन निर्णय अन्वये मान्यता दिलेली आहे.त्यानुसार वनरक्षक , वनपाल सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत, माहे फेब्रु २०२३ चे शासनाचे आदेशानुसार वनरक्षक, वनपाल यांचे सुधारित वेतनाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत याबाबत चर्चा करण्यात आली. योग्य कार्यवाही करण्यात येईल.असे आश्वासन दिले.
वनरक्षक वनपाल यांना दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात मोटारसायकल पुरवठा करणे बाबत प्रस्ताव दि.२१/०७/२०१६ रोजी शासन स्तरावरील चर्चे नुसार सादर करण्यात आला.याचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
पोलीस कर्मचारी यांचे पाल्यांना पोलीस भरती मध्ये ५% आरक्षणाचे कार्यपद्धती प्रमाणे वन विभाग मध्ये आरक्षण देण्याचे शासन स्तरावर प्रस्तावित करण्याचे आश्वासन दिले. वनसंरक्षण ,वन्यप्राणी संरक्षण व वन जमिनीवर अतिक्रमण बाबत गुन्हे दाखल करणाऱ्या वनरक्षक , वनपाल यांचेवर सातत्याने प्राणघातक हल्ले होतात.
वन कर्माच्र्यांना संरक्षणात्मक साहित्य संसाधन पुरवठा ,आरोपीचे विरूध्द प्रकरणाचा योग्य तो पाठपुरावा गृह खात्याचे मंत्रालयातील समिती समक्ष दर तिमाही मध्ये आढावा घेणे याबाबत दि.१९/१०/२०११ चे शासन निर्णयानुसार तरतुदींचे योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
प्रलंबित असलेला गणवेश व साहित्य पुरवठा या करिता निधीची लवकरात लवकर तरतूद करण्याचे सांगितले. उत्कृष्ठ कामगिरीबाबत उत्तेजनार्थ बक्षिसे याबाबत ची कार्यवाही, सूक्ष्म आरखड्या शिवाय इतर योजना व योजनेत्तर, कँपा निधी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे खात्यात निधी वर्ग न करणे.
सेवापुस्तकाची दुय्यम प्रत पुरविणे.
सेवा ज्येष्ठता यादी तात्पुरती व आक्षेपाची पूर्तता करून विहित कालमर्यादेत प्रसिध्द करणे . ओळखपत्र मिळणे.
विभागीय चौकशी प्रकरणे जास्तीत जास्त सहा महिन्यात पूर्ण करणे. वन जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलन ची जबाबदारी सहाय्यक वन संरक्षक या पदावर निश्चित करणे. प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयात महिला कर्मचारी यांचे करिता स्वच्छ्ता गृह निर्माण करणे.
वन्यजीव विभागात दुर्गम क्षेत्रात कार्यरत वनरक्षक वन पाल यांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करणे. महिला वनरक्षक यांना अतिसंवेदनशील क्षेत्रात अत्यंत जोखमीची कामगिरी न देणे. वनरक्षक वनपाल यांना साप्ताहिक रजा किंवा इतर दिवशी मोबदला राजा मिळणे इत्यादी वनरक्षक वनपाल यांचे सेवाविषयक अडीअडचणी बाबत चर्चा पार पडली संघटनेचे पदाधिकारी होते यात सर्व श्री, अरुण पेंदोरकर , सतीश गडलिंगे,ललित उचीबागले,आनंद तिडके, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.