Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Today72nd Miss Universe | महिला मिस युनिव्हर्ससाठी इतिहासात पहिल्यांदाच दोन ट्रान्सजेंडर स्पर्धकाची...

72nd Miss Universe | महिला मिस युनिव्हर्ससाठी इतिहासात पहिल्यांदाच दोन ट्रान्सजेंडर स्पर्धकाची निवड…

72nd Miss Universe : यंदाच्या 72व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत इतिहासात प्रथमच दोन ट्रान्सजेंडर स्पर्धक सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये 23 वर्षीय फ्लाइट अटेंडंट मरीना मॅचेटे हिने नुकतेच मिस पोर्तुगालचा किताब पटकावला आणि दुसरीकडे, मिस मशेटे आता जुलैमध्ये मिस नेदरलँडचा किताब जिंकणाऱ्या रिक्की कोलेशी मुकुटासाठी स्पर्धा करेल. ती 28 वर्षीय ट्रान्स महिला असून ती गेल्या 5 वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय ट्रान्सजेंडर महिला मशेटे ही फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत आहे. एका यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ पोस्टमध्ये, ती म्हणाली, “एक ट्रान्स वुमन म्हणून, मी जीवनात अनेक अडथळे पार केले आहेत, परंतु सुदैवाने आणि विशेषतः माझ्या कुटुंबासह, मी प्रेमाने इथपर्यंत पोहोचले आहे. तिने या स्पर्धकाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शेअर करताना सांगितले की, ट्रान्स वुमन म्हणून तिचा प्रवास सुरू करणे अनेक आव्हानांनी भरलेले होते.

रिक्की कोले- ट्रान्सजेंडर होण्याचे कारण
दुसरीकडे, रिकी कोले हा नेदरलँडमधील ब्रेडा या शहरातील आहे. कोले, जन्मतः पुरुष, त्यांनी ट्रान्सजेंडर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ट्रान्सजेंडर होण्याचे तिचे ध्येय इतरांना सक्षम करणे आणि भेदभाव दूर करणे हे आहे. कोलेचे ध्येय सामाजिक बदलाला चालना देणे हे आहे.

ट्रान्स स्पर्धक आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेचा मालक
मॅचेटे आणि कोलेच्‍या आधी, एंजेला पोन्‍सने 2018 मध्‍ये स्पेनचे प्रतिनिधीत्‍व करत मिस युनिव्‍हर्स स्पर्धेत पहिली ट्रान्स कंटेस्टंट म्हणून इतिहास रचला होता. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनची मालक स्वत: एक ट्रान्सजेंडर महिला आहे, तिचे नाव एनी जक्कापोंग जकरजुटाटिप आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: