Thursday, September 19, 2024
HomeमनोरंजनTiger 3 trailer | ट्रेलरमध्ये टायगर सलमान खानची डरकाळी...

Tiger 3 trailer | ट्रेलरमध्ये टायगर सलमान खानची डरकाळी…

Tiger 3 trailer : आज सलमान खान आणि कतरिना कैफची जोडीचा ‘टायगर 3’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला बरेच वर्षांनंतर दोघांनी एकत्र काम केल त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुक्ता आहे. या दोघांनी आतापर्यंत ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता त्याचे चाहते ‘टायगर-3’च्या पडद्यावर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सोमवारी म्हणजेच आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त ‘टायगर 3’ च्या ट्रेलरमधला इमरान हाश्मीचा लूकही लोकांना आवडला आहे. इमरान हाश्मीच्या या नव्या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

‘टायगर 3’ हा 2023 या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर ‘टायगर 3’ च्या एक्शन पॅक्ड ट्रेलरमध्ये जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की हा चित्रपटही खूप दमदार असणार आहे. ‘टायगर 3’ च्या ट्रेलरमध्ये प्रेम, द्वेष आणि युद्ध एकत्र दिसले.

ट्रेलरच्या सुरुवातीला एका महिलेचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, ‘देशाची शांतता आणि देशाच्या शत्रूंमध्ये किती अंतर आहे – फक्त एक माणूस’. त्यानंतर टायगर बाईकवर घुसतो आणि स्फोट घडवतो. मागच्या दोन भागात टायगर देशासाठी लढताना दिसला. पण टायगर यावेळी देशासाठी लढणार की कुटुंबासाठी, असा प्रश्न या ट्रेलरने उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘टायगर्स मेसेज’ नावाचा व्हिडिओ रिलीज झाला होता. त्यातही टायगर देशभक्त की देशद्रोही असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. टायगर देशवासीयांकडून त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र मागत होता.

सलमान खानला टक्कर देण्यासाठी यावेळी चित्रपटात इमरान हाश्मी देखील आहे, जो ट्रेलरमध्येच सलमानच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. इम्रानचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. सलमानचा हा चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: