दानापूर – गोपाल विरघट
म्हणतात ना गाव करी ते राव काय करी गावातील नागरिकांनी जर एकी दाखवली तर अश्यक्य गोष्टी शक्य होण्यासाठी वेळ लागत नाही असे उदगार प्रा. मुकूंद भारसाकळे यांनी दिवंगत प्रल्हादराव गोंडुजी विरघट यांच्या प्रथम स्मृतदिन व जलकुंभ लोकार्पण समारंभात गरुड धाम स्मशान भूमीत काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानापूर गावच्या सरपंच सपना वाकोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य.भन्ते शाक्यपूत्र राहुल होते. जलकुंभ लोकार्पण प्रसंगी बळवंतराव अकोट चे उपविभागीय अधिकारी अरखराव, शेषराव टाले मुख्यधिकारी न ,प .बाळापूर, पी, जे वानखडे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, संदीपपाल महाराज,
रामपाल महाराज समाज प्रबोधनकार, सतिश प्रघणे, राज्याध्यक्ष समाज एकता अभियान, तर प्रमुख पाहुणे भास्कर तायडे जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर, डॉ. संतोष येवलीकर तहसीलदार तेल्हारा, श्रीकृष्ण झाडोकार निरीक्षक जी ,एस ,टी ,पुणे, तेजेंद्र मेश्राम सहायक पोलिस निरीक्षक नागपूर, विनोद सदावर्ते लेखक, सुकेसनी जमदाळे पोलीस उपनिरीक्षक मुंबई, सागर ढगे उपसरपंच, संतोष माकोडे पोलीस पाटील, बळीराम बावणे तंटामुक्ति समिती अध्यक्ष,
गरुड धाम समितीचे अध्यक्ष विश्वासराव विखे , गणेश विखे , सुमेध घनबहादूर, सचिन गावंडे आदींची मंचावर उपस्थितीती होती. यावेळी संदीपपाल महाराज , म्हणाले की आज स्मशान भूमी सारख्या ठिकाणी लोक फक्त एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात.
मात्र दानापूर येथे धार्मिक कार्यक्रम, आणि जलकुंभाचे लोकार्पण, व चक्क जेवणाचे या सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात ही एक बदलाची नांदी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, सोबतच ज्या वयोवृद्ध लोकांनी गावकर्यांच्या साथीने समशान भूमीत केलेली वृक्ष लागवड, विविध प्रकारचे लावलेल्या फुलझाडांनी आम्हा सर्व लोकांना प्रभावित केले त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. सोबतच यावेळी भन्ते शाक्यपुत्र राहुल धम्मदेसना दिली, पी, जे वानखडे , रामपाल महाराज , आदींनी समाज प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वप्रथम दिवंगत प्रल्हाद विरघट यांच्या प्रतिमेचे पूजन करून अकोट चे उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव, व मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले सोबतच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीचा समाज एकता अभियान ग्रूप व विनोद विरघट परिवारच्या वतीने, मान्यवरांच्या हस्ते गरुड धाम समिती दानापुर, भास्कर तायडे , सतीश घनबहादुर, सुकेसनी जमदाळे, विनोद सदावर्ते, श्रीकृष्ण झाडोकर,
प्रा.प्रघणे ह्यांना सामाजिक कार्य, न्याय हक्क, पत्रकारिता, पर्यावरण, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल समाज गौरव पुरस्कार,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी गावातील तरुण मंडळींचा सिंहाचा वाटा होता
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन … साहेबराव मोरडे सर यांनी तर आभार सुनीलकुमार धुरडे यांनी मानले….