गडचिरोली/अहेरी – होऊ द्या चर्चा या कार्यक्रम अंतर्गत भामरागड तालुक्यातील हेमलकसा व हिणभट्टी येथील लोकामध्ये जावुन चर्चा करण्यात आली. याप्रसंगी राज्यात २०१९ मध्ये उद्धव ठाकरे साहेबांचे नेतृत्वात सत्तेत आलेली महाविकास आघाडी ची लोकाभिमुख कामे जसे शिव भोजन,शेतकर्यांना कर्ज माफी,गडचिरोली जिल्ह्याचे विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणे,कोरोना काळात केलेले उल्लेखनीय काम,बेघर लोकांना घरकुल वै.बाबत चर्चा करण्यात आली.
तसेच केंद्र सरकारची फसवी गँस योजना उज्वला मधील गँस ची गगनाला भिडलेली वाढ,सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर झालेली भाव वाढ,त्यावरील सबसिडी जी आता पुर्ण बंद केलेली आहे,घरकुलाची निधी थांबवने, शाळाचे खाजगीकरण, आरोग्य विभागात ही नोकर भरती खाजगी कंपनीचे माध्यमातुन करणे,पोलीस भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने करणे, डिझेल – पेट्रोल चे वाढलेले भाव,प्रत्येकाचे खात्यात १५ लाख रुपये टाकन्याचा जुमला वै.अनेक फसव्या घोषणाचा भंडाफोड करण्यात आला.
उद्धव ठाकरे साहेबांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ व त्यांची जनतेसोबत असलेली बांधीलकी तसेच बोललेला शब्द पाडण्याचा स्वभाव बघुन आम्ही निश्चितच येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना ( उ.बा.ठा.) लाच मतदान करणार अशी ग्वाही दिली.
होऊ द्या चर्चा माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश केदारी अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजी पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम अहेरी विधानसभा संघटक बिरजू जी गेडाम. युवा सेना च्या वतीने घेण्यात आला.या वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.