रामटेक – राजू कापसे
रामटेक मध्ये कालंका देवि मंदिर म्हणजे कालीदेवीचे स्वरूप महाकालीचे प्रतिक आहे. हे मंदिर आदिशक्तीचे एक प्रतीक आहे. भक्तांचा विश्वास आहे की भक्तांची श्रद्धा उत्कट झाल्यास दृष्यरूपाने व्यक्त होवून साक्षात दर्शन देते. येथे नवरात्रा मध्ये मा कालंका देविचा दर्शनासाठी भक्तांची गर्दि असते. दूर-दूरून भक्त दर्शनासाठी येतात. कोरोना काळ असल्याने मंदिर व्यवस्थापन ने भक्तांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेण्याचे आव्हान केले.
कालंका देवी मंदिर फार पुरातन म्हणजे राष्ट्रकूटकालीन इ.स. 8 ते 9 शतकातले आहे. मंदिरात कालंका देवीची सुरेख अशी संगमवरी 4 फुटाची मृति आहे. प्राचीनतेचा दृष्ष्टीकोनातून विचार करता हे मंदिर गडमंदिरावरील वाकाटक कालीन मंदिरानंतरच्या मंदिर स्थापत्य रचनेत झालेला प्रगतीचा टप्पा दाखवणारे मंदिर आहे.
पूर्वमुखी असलेल्या मंदिरात गर्भगृह व मंडप असी दोन प्रमुख भाग आहेत. मंदिराचे संपूर्ण बांधकाम वालूकापाषाणातील आहे. मंदिराचे शिखर अर्धवर्तुळावर पदम क्षीनी अलंकृत असुन गजपृष्ठाकृती म्हणजेच हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे. मंदिर हे प्राचीण स्थापत्याचा एक उत्कृष्ठ नसूना आहे.
मंदिर कमेटीचे अध्यक्ष मधुकर सहारे, सुधाकर सहारे, दिलीप देशमुख, अनिल भोरसले, अरविंद अंबागडे, रमेश कोठारी, चंद्रकांत ठक्कर, दयाराम रेवतकर, बबन क्षीरसागर, अरूण पोकळे, नत्थू घरजाडे, दुर्गेश खेडगरकर, रीतेश चौकसे, सुमित कोठारी, निर्भय घाटोळे, महेंद्र माकडे, रवी महाजन, वसंता डामरे सहीत आदि सेवक व्यवस्था बघत आहे.