Israel Hamas War : सध्या दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. आतापर्यंत दोघांकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. यामध्ये 2400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले आहेत, तर गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाच्या गोळीबारात 1200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
दरम्यान पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलच्या सीमावर्ती भागावर हल्ला केला तेव्हा असेच काहीसे घडले. आता याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने आघाडी उघडली असून आपल्या देशातील राखीव सैनिकांनाही युद्धात उतरण्यासाठी पाचारण केले आहे.
राखीव सैनिकांच्या जोडीची अशीच एक कहाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. देशासाठी बलिदान देण्याची वेळ आली की कोणीही मागे हटत नाही. कर्तव्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या राखीव सैनिकांमध्ये उरी मिंट्झर आणि एलिनॉर जोसेफिन यांचाही समावेश आहे. हे दोघेही राखीव सैनिक असून युद्धाच्या मैदानावर आहेत जे एकमेकांवर प्रेम करतात. अशा परिस्थितीत युद्धाची हाक येताच त्यांनी मोठा निर्णय घेतला.
युद्धावर जाण्यापूर्वी लग्न केले…
Uri Mintzer आणि Elinor Yosefin वेगवेगळ्या युनिटमध्ये आहेत आणि त्यांच्या पोस्टिंगवर जाण्यापूर्वी त्यांना मोठा निर्णय घेतला आहे. हे प्रेमी युगल थायलंडमध्ये असताना त्यांना त्यांच्या देशातील परिस्थितीची माहिती मिळाली. त्याला आपत्कालीन राखीव कर्तव्यासाठी बोलावण्यात आले. अशा परिस्थितीत रविवारी रात्रीच त्यांचे लग्न झाले. मध्य इस्रायलमधील शोहम येथे पारंपारिक समारंभात त्यांचे पालक आणि काही मित्र उपस्थित होते. मिंट्झर म्हणाले की त्यांनी हजारो वेळा लग्नाचा विचार केला होता पण इतकी घाई होईल याची कल्पनाही केली नव्हती.
Israeli couple ties the knot on eve of military deployment #AndyVermautLovesTheJewishNewsSyndicate https://t.co/xbEt1AiV73 pic.twitter.com/HU9JwtYDrT
— Andy Vermaut (@AndyVermaut) October 9, 2023