Share Market Update : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम आता शेयर बाजारात दिसून येत आहेत. युद्धामुळे जगभरातील बाजारातील घसरण सुरूच आहे. भारतातही सोमवारी बीएसई सेन्सेक्स आणि बीएसई निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सध्या सेन्सेक्स 500 अंकांच्या घसरणीसह उघडला आहे. तर निफ्टी 19 हजार 500 च्या जवळ आला आहे. शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि सुझलॉनचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आहेत. तर VIX मध्ये 12 टक्के वाढ नोंदवली गेली.
गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले
मिळालेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 316 लाख कोटींवर आले आहे जे गेल्या सत्रात 320 लाख कोटी रुपये होते. जर आपण सेन्सेक्सबद्दल बोललो तर, टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी, इंडसइंड बँक जेडब्ल्यूएस स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे, तर टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक पीएनबीच्या समभागांच्या घसरणीमुळे निफ्टी पीएसयू 2.5 टक्क्यांनी घसरले.
भारतावर परिणाम होणार नाही
तज्ज्ञांच्या मते, इस्रायल-हमास संघर्षामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत आणि ते माघार घेत आहेत. बाजारात प्रचंड अनिश्चितता आहे. सध्या तेल पुरवठ्यात कोणताही मोठा अडथळा दिसत नाही. मध्य आशियातील काही देश हमासच्या समर्थनात आले असले तरी भारताने त्याआधीच तो कमी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या दरात वाढ झाली आहे. पण त्याचा प्रभाव सध्या भारतीय बाजारपेठेत दिसत नाही.