सांगली – ज्योती मोरे.
उपोषनकर्त्यांचा सत्कार आणि यथोचित सन्मान पाहून जमातीसाठी लढण्याची ऊर्जा घ्यायची आहे व लढणार्यास आपल्या उपस्थितीने बारा हत्तीचे बळ द्यायचे आहे. चौंडीतील उपोषनकर्ते मा. सुरेशदादा बंडगर, मा. आण्णासाहेब रुपनवर तसेच मा. बाळासाहेब दोडत्तले यांचा सांगलीत रविवारी ८ अाॅक्टोबरला ३ वाजता सत्कार कार्यक्रमाबरोबर चौंडी उपोषनास पाठिंबा म्हणून मिरी पाथर्डी येथे मा. राजुमामा तागड, मा. बाळासाहेब कोळसे यांनी ११ दिवस उपोषन केले.
दहिवडी येथे सर्व मा. नितिन कटरे, शरद गोरड, सुरेश गोरड, वैभव गोरड यांनी ६ दिवस उपोषन केले.व उदगाव ता. शिरोळ संदिप गावडे, अमोल मरळे, दिपक ठोंबरे , मल्लाप्पा धनगर यांनी २ दिवस उपोषन केले. तसेच सन २०१४ मध्ये बारामती येथील १६ उपोषनकर्ते यांचा यथोचित सन्मान असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आपण मोठ्या संख्येने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन मा. पुंडलिकतात्या गडदे यांनी केले यावेळी माजी महापौर सौ. संगिताताई खोत, माजी महापौर नितिन सावगावे, मा.नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, अस्मिता सलगर, गजानन मगदूम, प्रकाश ढंग,मलान हुलवान,मा. चंद्रकांत हुलवान, मा.मनगुआबा सरगर,
मा. मनोजदादा सरगर, मा. संजय यमगर, मा. गजानन आलदर, मा. नगरसेविका सौ. कल्पना कोळेकर, सौ. लक्ष्मी सलगर, सौ. सविता मदने, शाहजी कोकरे,वंदना सायामोते,निवांत कोळेकर, सुरेश पांढरे, अनिल कोळेकर, तानाजी दुधाळ आदी उपस्थित होते.