Israel-Palestine War : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास ने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 250 इस्रायल नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझाला स्मशानभूमीत रूपांतरित करणार असल्याचे म्हटले आहे. गाझाचे तळ भंगारात आणण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे हमासने इस्रायलवर केलेले हल्ले आणि नंतर इस्रायलच्या पलटवारानंतर जग दोन गटात विभागले गेले आहे.
शनिवारी हमासने इस्रायलवर रॉकेट डागले, हमासचे शेकडो दहशतवादी गाझा पट्टीजवळील इस्रायली शहरांमध्ये घुसले. सुमारे 250 लोकांना ठार मारण्याबरोबरच इतर लोकांनाही हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. तर सध्या सोशल मिडीयावर एक video व्हायरल ज्यामध्ये गाझामध्ये दाखल झालेले इस्रायलीचे 4 युद्ध हेलिकॉप्टर दहशतवाद्यांनी पाडले. हॉलिवूड चित्रपटात दाखवतात तसेच दृश्य दिसत आहे. मात्र हा video चुकीची असल्याचे X कडून सांगण्यात येत आहे तर हा Video Arma 3 व्हिडिओ गेमशी संबंधित असल्याचे X पोस्टमध्ये सांगितले आहे.
Hamas म्हणजे काय?… त्याचा काय इतिहास आहे?…येथे जाणून घ्या….
Palestinian freedom fighters shot down 4 Israeli war helicopters in Gaza.#Palestine #Israel #Hamas #Gaza #War #AlMayadeen #AlAqsa #طوفان_الأقصى #الأهلي_الاتحاد pic.twitter.com/C75JpQx96E
— The Muslim (@TheMuslim786) October 7, 2023