Friday, November 22, 2024
HomeBreaking Newsअकोला | बुलडाणा भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचा गाडीला अपघात...काटेपुर्णा जवळील...

अकोला | बुलडाणा भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचा गाडीला अपघात…काटेपुर्णा जवळील घटना…

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेपुर्णा नजीक आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान बस व कारचा अपघातात झाला. कार मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे हे होते सुदैवाने ते बचावले. माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह चार जण व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. एका बसने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. अमरावती येथे जात असताना ही घटना घडली. मात्र, सुदैवाने गाडीतील एअरबॅग वेळीच उघडल्याने विजयराज शिंदे यांना किरकोळ मार लागला आहे. तर एसटी बसमधील दोन विद्यार्थी तथा दोन वयोवृद्ध महिलाही सुद्धा जखमी झाल्या आहेत.

राष्ट्रीय राज्य महामार्गावरील कुरणखेड गावाजवळील नवीन वस्ती गावाजवळ दुपारी बुलढाण्यावरून अमरावतीच्या दिशेने जाणारी गाडी क्रमांक एम एच २८ ए एन २७५७ ही गाडी जात असताना समोरून येणारी बस क्रमांक एम एच ४० एन ९७१८ ही कारंजा वरून अकोल्याच्या दिशेने जात होती. दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली असून यामध्ये कार मध्ये बुलढाण्याचे भाजपा माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह त्यांचे चार सहकारी, बसमधील दोन शाळकरी विद्यार्थी, दोन वयोवृद्ध महिला जखमी झाले आहेत.

जखमींना कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रंजीत घोगरे, शहाबाज शाहा, विरेंद्र देशमुख, राम उमाळे, विजय माल्टे, मोहण वाघमारे,शेख माजिद यांनी पोहोचवले आपत्कालीन बचाव पथकाच्या माध्यमातून महामार्ग वरील वाहतुक सुरळीत करून वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे योगेश काटकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. भाजपा आमदार अपघातात जखमी झाल्याची बातमी समजताच घटनास्थळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: