Friday, November 22, 2024
Homeराज्यमहात्मा गांधी सत्याचे तर लाल बहादूर शस्त्राचे आग्रही : आमदार सुधीरदादा गाडगीळ...

महात्मा गांधी सत्याचे तर लाल बहादूर शस्त्राचे आग्रही : आमदार सुधीरदादा गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे तर साऱ्या जगाचे आशास्थान झाले. अहिंसा, सत्यागृह याद्वारे मानव जातीत क्रांती करता येते हे त्यांनी दाखवून दिले.

पण पंतप्रधान या नात्याने लालबहादूर शास्त्रींनी प्रसंगी शस्त्र धरून आक्रमणाचा निर्धार करून देशाचे सामर्थ्य दाखविता येते. हे दाखविले कोणत्या काळात काय केले पाहिजे हे या दोन महापुरुषांनी आपणास दाखविले आहे. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार सुधीर गाडगीळ यांनी आले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार नितीनराजे शिंदे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, अशरफ वांकर, सुजित राऊत, रविंद्र ढगे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, इम्रान शेख, प्रियानंद कांबळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: