रामटेक – राजु कापसे
शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात “होऊ द्या चर्चा” हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन रामटेक विधानसभा हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाते,परंतु गद्दाराच्या पक्ष फोडी नंतर रामटेक विधानसभेत शिवसेना पक्ष पूर्ण जोमाने कामाला लागलेला दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरापासून रामटेक विधानसभा पक्ष संघटन बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्ते, पदाधिकारी दिवस-रात्र काम करीत आहे. शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा रामटेक विधानसभा हा आस्थेचा विषय असून या विधानसभेवर जास्तीचे लक्ष केंद्रित केले आहे.
पक्षप्रमुखांच्या आदेशाने 01 आक्टोबर ते 12 आक्टोबर च्या दरम्यान “होऊ द्या चर्चा” अभियान रामटेक विधानसभा क्षेत्रात राबविण्यात येत असून काल दि. 01 आक्टोबर ला रामटेक शहरात अभियान संपन्न झाले. यावेळी केंद्र सरकार व राज्यसरकारच्या बोलघेवड्या योजनांचा फंडाफोड येथील स्थानिक नेत्यांनी व पदाधिकारी केला.
वाढलेली महागाई, बेरोजगारी,विदर्भातील शेतकरी आत्महत्या, कंत्राटी पद्धतीने घेत असलेल्या शासकीय पद भरत्या व जनतेला दिलेल्या थोतांड आश्वासनावर जनता चिडलेली असून येत्या निवडणुकीत जनता व नवीन पिढीतील युवक माफ करणार नाही असे शिवसेना रामटेक विधानसभेचे प्रमुख श्री. विशाल बरबटे व जिल्हा प्रमुख श्री.देवेंद्र गोडबोले यांनी उपस्थित रामटेक शहरातील नागरिकांना संबोधित केले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, पारशिवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना जिल्हा प्रमुख समीर मेश्राम, रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, तालुका संघटक अनिल येळणे, संपर्क प्रमुख नरेश भोंदे, उपतालुका प्रमुख संदिप वंजारी,देवराव ठाकरे, उपशहर प्रमुख देवेंद्र कोहळे, सचिन देशमुख,
राहुल टोंगसे,सर्कल मरमुख जितेंद्रसिंग जांबे,नाना ठाकरे,रंगलाल यादव, जेष्ठ शिवसैनिक रतिराममामा रघुवंशी युवासेना तालुका प्रमुख निकुंज गराडे,जय रहांगडाले सह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.