अकोला – अमोल साबळे
बाळापूर तालुक्यातील शेतकन्यांच्या सन २०२० २०२१ मध्ये मंजूर झालेले पिक विमा एच.डी.एफ.सी. इन्शुरन्स कंपनी कडे ३०% प्रलंबित आहे. तसेच शासनाने जाहिर केलेले प्रोत्साहनपर अनुदान अजुनही सभासदांपर्यंत पोहचलेले नाही. याबाबतीत योग्य ते निर्देश देण्यात यावे, तसेच जुलै २०२३ मध्ये जाहिर झालेल्या अतिवृष्टीची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही.
त्याचबरोबर चालू वर्षातील २५ टक्के पिक विमा त्वरीत देण्यात यावे, ही विनंती. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद व मुग या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झालेली तरी दसरा दिवाळी सणासुदीचा काळ लक्षात घेता अशा गंभीर परिस्थिती मध्ये असलेल्या शेतकन्यांना वरील निर्देशीत केलेली मदत तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी अजिंक्य राजेश राऊत, महेश चव्हाण ,पुरुषोत्तम तायडे, ज्ञानेश्वर माळी, सचिन कोगदे, महादेव तायडे.