रामटेक – राजू कापसे
ज्ञानदिप कॉलेज ऑफ फार्मसी शितलवाडी, रामटेक मध्ये जागतिक फार्मसी दिवसावर व्यक्तित्व विकास कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. उद्घाटन मनोसंवाद सायकोथेरपी केंद्र दिलीचा आश्विनी काटोके यांनी केले.
कार्यक्रमाची अध्यक्षता संस्था अध्यक्ष गजेंद्रकुमार चौकसे यांनी केली. या वेळी प्रामुख्याने डॉ. एम. एस. कुरेशी, डॉ. अब्दुल गणी, सचिव केवल हटवार, सीईओ गीता भास्कर, प्राचार्य रुबी खान सहित विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
मनोसंवाद सायकोथेरपी केंद्र दिलीच्या आश्विनी काटोके मार्गदर्शन पर म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी साफ्ट स्कील, स्ट्रेस मॅनेजमेंट, रीलेशनशिप बिल्डिंग, माइंडफुलनेस घ्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
संस्थाध्यक्ष गजेंद्रकुमार चौकसे म्हणाले की मानव जिवनात औषध निर्माण शास्त्र महत्वाचे आहे, त्यांचे सखोल ज्ञान असने जरूरी आहे . यावेळी डॉ. एम. एस कुरेशी वं डॉ. अब्दुल गणी यांनी उपचार पहली विषयी मार्गदर्शन केले.
या निमित्य विद्यार्थी यानी रामटेक शहरात रैली काढून स्वछते विषयी जनजागरण केले.पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीत करीता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम केले.