Friday, September 20, 2024
Homeराज्यमाजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न...

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न…

आरती ला सह कुटुंब उपस्थित राहून गरजूनां साडी वाटप केले

आलापल्ली येथे यावर्षी पासून टायगर ग्रुप श्री गणेश मंडळ कडून गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर क्रीडा संकुल येथे श्री गणराया ची स्थापना करून प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.त्या निमित्याने टायगर ग्रुप श्री गणेश मंडळाच्या विनंती ला मान देऊन भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम सह सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,माजी जिल्हा परिषद सदस्या यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.

टायगर ग्रुप च्या पदाधिकारी मार्फत रोज निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते ग्राम पंचायत आलापल्ली येथील स्वच्छता कर्मचारी व गावातील गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुप श्री गणेश मंडळाचे पदाधिकारी सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: