अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन बेनोडा हद्दीत ग्राम वंडली येथे जावयाने आधी सासू आणि मेव्हण्याला ठार मारून स्वतःही आत्महत्या केल्याच्या घटनेने सदर परिसरात खळबळ उडाली. दि. २५/०९/२०२३ चे रात्री ०१.१५ दरम्यान श्रीमती लताबाई सुरेशराव भोडें यांचे घरातुन धुर निघत असल्याची माहीती गावातील पोलीस पाटील यांचेकडुन प्राप्त होताच बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. स्वप्नील ठाकरे हे स्टाफ व अग्नीशमन दलासह घटनास्थळावर दाखल झाले. पोलीस व अग्नीशमन दलाचे मदतीने घराचा दरवाजा उघडुन लागलेली आग त्वरीत विझवुन पाहणी केली असता घरात ०३ व्यक्तींचे पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आले.
चौकशी दरम्यान माहीती मिळाली की, सदरचे घरात सौ. लताबाई सुरेशराव भोडें ही त्यांची सासु चंद्रकला वय, ९० वर्ष व मुलगा प्रणय यांचे सोबत राहत असुन सासु हया मागील खोलीत झोपल्या होत्या व आग लागलेली असल्याचे कळताच गावकऱ्यांनी मागील तुराट्यांची भिंत तोडुन सदर वयोवध्द सासु हीला घराबाहेर काढले असतांना, ०३ व्यक्तींचे मतदेह समोरच्या खोलीत आढळुन आले. सदरचे मृतदेह त्या घरात राहणाऱ्या लताबाई सुरेश भोंडे, वय ४७ वर्षे व त्यांचा मुलगा प्रणय सुरेश भोंडे, वय २२ वर्षे यांचे असल्याचे समजले.
श्रीमती लताबाई भोडें यांच्या मुलीने ६ महीण्याआगोदर वरुड येथील आशिष ठाकरे यांचे सोबत प्रेम विवाह केला होता. आशिष ठाकरे हा मुलीला दारू पिवुन नेहमी मारहाण करीत होता त्यामुळे ती ३ महीण्याओगादर ही माहेरी परत आली तीला तीचा पती वंडली येथे येवुन सुध्दा त्रास देवु लागल्याने मुलीला तिच्या मावशीचे घरी राजुरा बाजार येथे राहण्यास पाठविले होते. मुलगी नांदायला येत नसल्याने आरोपी मृतक नामे आशिष ठाकरे, रा. वरुड हा घटनेच्या दिवशी दारु पिवुन सासुचे घरी आला व त्याने सासु श्रीमती लताबाई सुरेशरावभोडें व साळा प्रणय यांना जिवे ठार मारल्या नंतर सोबत आणलेल्या पेट्रोलचा वापर करुन त्यांचा मृतदेह जाळला व स्वतः सुध्दा जळुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक स्तरावर दिसुन येत आहे. आरोपी आशिष याने वरुड येथील मित्राची मोटार सायकल घेवुन त्या मोटार सायकलमध्ये पेट्रोल टाकले व स्वतः एका प्लॉस्टीक बॉटलमध्ये १०० रु चे पेट्रोल वेगळे विकत घेतल्याचे व मित्रास वंडली येथे रात्री दरम्यान सोडुन मागीतल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न होत आहे.तसेच आरोपी आशिष याने त्याचे मावस सासरे दिनेश निकम यांना रात्रीला मोबाईल फोनवर संपर्क करुन लताबाई व प्रणय यास मारुन टाकल्याचे आणी स्वतः सुध्दा आत्महत्या करीत असल्याचे सांगीतल्याने व आशिष याची बॅग, जॅकेट, पॅनकार्ड घटनास्थळावर मिळाल्याने तीसरा मृतदेह हा आशिष ठाकरे याचा असल्याचे निदर्शनास येत आहे.
आरोपी आशिष याने सदरचे कृत्य केल्याचे निदर्शनास येत असल्याने श्री. दिनेश निकम,रा.राजुरा बाजार यांचे तक्रारीवरुन मृतक आरोपी आशिष पुरुषोत्तम ठाकरे याचे विरुध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येत आहे. घटनास्थळावर श्वान पथक व गुन्हे तपास पथक यांना प्राचारण करुन तपासाचे दृष्टीने आवश्यक पुरावे हस्तगत करण्यात आलेले आहेत… घटनेचे गांभिर्य पाहतां घटनास्थळावर मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी, श्री. किरण वानखडे, पोलीस निरिक्षक, श्री. नितीन चुलपार, पो.उप.नि., स्था. गु.शा. अमरावती भेट दिली असुन पुढील तपास श्री. स्वप्नील ठाकरे, ठाणेदार, पो.स्टे.बेनोडा हे करित आहेत.