सांगली – ज्योती मोरे
एक देश एक कर या जीएसटी प्रणाली नंतर देशभरातील तेरा राज्यात चेक पोस्ट बंद करण्यात आले नाहीत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली या संघटनेने ठराव करून याबाबत महाराष्ट्र,छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यातील शासनास 2 ऑक्टोबर पर्यंत आपापल्या राज्यातील चेक पोस्ट बंद करण्याचा इशारा दिलाय.
अन्यथा 2 ऑक्टोबर नंतर याबाबतीत पुन्हा एकदा बैठक घेऊन या तिन्ही राज्यात चक्काजाम सारखा निर्णय घेण्याचा इशाराही ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली या संघटनेचे मॅनेजिंग काऊंसिल बाळासाहेब कलशेट्टी यांनी दिलाय.
दरम्यान सांगलीतील बापूसो पाटील ट्रक टर्मिनल या वखारबागातील 17 एकर जागे संदर्भात मंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन आराखडा तयार करण्यास सांगितल्याचही कलशेट्टी यांनी सांगितले.
यावेळी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, सचिव प्रितेश कोठारी ,उपाध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष भाग्येश शहा,सेक्रेटरी नागेश म्हारगुडे,खजिनदार मयंक शहा,संचालक आशिष आवळे, निलेश गोरे,संदीप तांबडे, रोहित सावळे, विठ्ठल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.