दिनांक ०४/०९/२०२३ रोजी ग्राम कावला ता. भैसदेही, मध्यप्रदेश येथील पती कचरु सुखराम कास्दे व पत्नी नितु कचरु कास्दे असे महाराष्ट्रातुन मजुरी काम करुन घाडलाडकी मार्गे आपले ग्राम कावला (मध्यप्रदेश) गावी जात असता घाडलाडकीचे समोर रस्त्यावर दोघा पती पत्नीमध्ये वाद होवुन पती कचरु कास्दे याने त्याची पत्नी नितु कचरु कास्दे वय ४२ वर्ष रा. कावला ता.भैसदही, मध्यप्रदेश हिचा खुन केला व पळुन गेला अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. ब्राम्हणवाडा (थडी) येथे अपराध क. ३५२ / २३ कलम ३०२ भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे कचरु सुखराम कास्दे वय ४८ वर्ष रा.कावला ता.भैसदेही, मध्यप्रदेश हा घटनेदिवशी पासुन खुन करुन फरार झाला होता त्याचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सतत कार्यरत होते. परंतु आरोपी हा पत्नीचे अंतिमसंस्कार वेळी अथवा त्याचे गावात हजर न येता सतत फरार होता. शेवटी पोलिसांनी नेमुण दिलेल्या गोपनिय खबरीकडुन माहीती मिळाली कि, गुन्हयातील फरार आरोपी कचरु सुखराम कास्दे हा पोलिसांचे भितीने बडनेरा येथे लपुन बसला आहे.
अशा खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लगेच बडनेरा येथे पोहचले व आरोपी पळुन जावु नये करीता योग्य रितीने सापळा लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कचरु सुखराम कास्दे वय ४८ वर्ष रा. कावला ता.भैसदेही, ति.बैतुल, मध्यप्रदेश असे सांगीतले.
त्यास सदर गुन्हयात अटक करुन पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन ब्राम्हणवाडा (थडी) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई मा.श्री. अविनाश बारगळ, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., मा.श्री. शशिकांत सातव, अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, सचिन मिश्रा चालक संजय गेठे यांनी केली.