सांगली – ज्योती मोरे
जिल्ह्यात मोटिरसायकलींसह मोबाइल चोरणाऱ्या तासगाव तालुक्यातील पाच जणांच्या टोळीस आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरजेतील वंजाळे पेट्रोल पंपाजवळ सिव्हिल हॉस्पिटल रोडवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटारसायकली तसेच मोबाईल असा एकूण 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील मोटारसायकलींसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्या संदर्भात तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिल्यानुसार तपास करत असताना खास बातमीदारांने विश्वजीत सचिन थोरात. वय वर्षे- 19,राहणार- पाटील गल्ली, येळावी. गुंजन गुणवंत पोतदार. वय वर्ष- 19, राहणार- सोनार मळा,
तासगाव. रितेश राजेंद्र पाटील.वय वर्ष -19. राहणार- शांतीनगर, येळावी.सौरभ गजानन कांबळे.वय वर्षे- 21, राहणार- पाचवा मैल आणि नागेश दिलीप सावंत.वय वष,- 23.राहणार- निमणी.हे पाच जण मिरज मधील वंजाळे पेट्रोल पंपाजवळ सिव्हिल हॉस्पिटल रोडवर चोरीच्या गाड्यांसह चोरीचे मोबाईल घेऊन ते विक्रीसाठी थांबले असल्याची माहिती दिली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, असता त्यांनी सदरच्या गाड्यांचं मोबाईल हे चोरल्याचा कबूल केले आहे.
याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, सदरचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्यानंतर सदरच्या दोन काळ्या रंगाच्या हिरो होंडा स्प्लेंडर ,एक सॅमसंग गॅलेक्सी ए १४ तर एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार, अमोल ऐदाळे, राजू शिरोळकर, अमर नरळे, कुबेर खोत, पोलीस नाईक, सोमनाथ गुंडे,पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव,अजय बेंद्रे, सोमनाथ पतंगे, चालक पोलीस शिपाई शिंदे आदींनी केली आहे.