रामटेक – राजु कापसे
काल मंगळवार दिनांक 12/09/023 रोजी रवी भवन, नागपूर येथे मुबई येथील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व रामटेक लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख श्री.बाळाभाऊ राऊत तसेच होऊ द्या चर्चा या अभियानाचे निरीक्षक श्री प्रशांत कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक लोकसभा क्षेत्राची आढावा बैठक पार पडली. शिवसेना पक्ष प्रमुख आ. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम राबविल्या जात आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा पर्दाफाश करणे,गेल्या नऊ वर्षात जनतेला दिलेले आश्वासन संबंधित जाब विचारणे, गावा-गावात जाऊन महागाई, बेरोजगारी व सरकारच्या फसव्या योजनांबद्दल जनतेला जागृत करण्याचे काम शिवसेना पक्षाच्या वतीने या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
1ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या दरम्यान होऊ द्या चर्चा हे अभियान रामटेक लोकसभा क्षेत्रातील तिन्ही विधानसभेत यशस्वीरित्या राबविण्यासाठी संपर्क प्रमुख बाळाभाऊ राऊत यांनी या आढावा बैठकीत सूचना केल्या.
याप्रसंगी या आढावा बैठकीला शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,नागपूर (ग्रा)जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले,रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे,माजी खासदार प्रकाश जाधव,कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे,रामटेक लोकसभा सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे व रामटेक विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा प्रमुख,
माथाडी कामगार जिल्हा प्रमुख,युवासेना जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख,शहर प्रमुख,उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख,संपर्क प्रमुख,विधानसभा संघटक,तालुका संघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख तसेच कामठी व उमरेड विधानसभा क्षेत्रातील सर पदाधिकारी उपस्थित होते.