खामगाव – सेवा पंधरवडा अंतर्गत आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ आज आ.अँड. आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला, या मोहिमेंतर्गत समस्त जनतेने आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.अँड.फुंडकर यांनी केले.
भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा राबविला जात आहे. या अंतर्गत आयुष्यमान भव ही आरोग्य सेवा बाबत महत्त्वकांशी मोहीम राबविल्या जात आहे. यामध्ये 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह आरोग्य संस्थानांमध्ये राबविले जाणार आहे.
तसेच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा राबविला जाणार आहे. यामध्ये स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, आयुष्मान सभा, आदि कार्यक्रम ठीकठिकाणी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने प्रत्येकांना पाच लाखापर्यंत चा आरोग्य विमा जाहीर केला आहे. पंधरवाड्यात आरोग्य सुविधा मोफत देण्यात येणार आहे.
त्या सुविधा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत बसत नसतील अशा रुग्णांनाही मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रोपती मुर्म्मु यांचे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शुभ हस्ते ऑनलाइन प्रणाली द्वारे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर खामगावात उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आ. अँड. आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माता धनवंतरी यांचे पूजन व दीपप्रज्वलाने मान्यवरांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना बोलताना आ.अँड. फुंडकर म्हणाले की या मोहिमेंतर्गत समस्त नागरिकांनी आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, काढून घ्यावे, जेणेकरून सर्वांना मोफत उपचार मिळतील.
तसेच जे आजार योजनेत बसत नसतील त्यांनीही या मोहिमेचा मोफत लाभ घ्यावा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, यांनी सुद्धा सर्व लोकांपर्यंत पोहोचून अधिकाधिक रुग्णांना लाभ द्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मंचावर आ अँड फुंडकर यांचेसह तहसीलदार अतुल पाटोळे, श्री विकास अधिकारी श्री राजपूत, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशातून टीबी म्हणजेच क्षयरोग नाहीसा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या वर्षभरापासून विशेष मोहीम राबविली. खामगाव मध्ये या मोहिमेचे घरोघरी जाऊन उत्कृष्ट कार्य केले. चांगले कार्य करणारे टीबी चॅम्पियन म्हणून पल्लवी कुटे, सय्यद इम्रान सय्यद सलीम व निक्षय मित्र असलेले प्रशांत भडंग, विजय काकडे, सचिन पडघान, सुभाष खोडे यांचा विशेष सत्कार आ. अँड. आकाश फुंडकर यांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अधीसेविका श्रीमती पि. यन. बोरोकार, यस बी पाजई, श्रीमती जी जे पवार, श्रीमती वासनकर, श्रीमती बावनकुळे, म्हात्रे, श्रीमती जाधव, आदि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ज्या नागरिकांना या मोहिमेचा लाभ घ्यायचा आहे अश्या सर्वांनी खामगाव सामान्य रुग्णालयात यावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे यांनी केले.
यासाठी या मोहिमेचे वैद्यकीय समन्वयक प्रवीण चव्हाण, आरोग्य मित्र अवि तायडे व पंकज लिखार यांचेशी संपर्क साधावा आणि आयुषमान कार्ड, आभा कार्ड मोफत काढावे जेणेकरून तुम्हाला शासकीय नव्हे तर शासनाने निर्गमित केलेल्या खाजगी रुग्णालयात सुध्धा उपचार मोफत घेता येईल असे आवाहन डॉ निलेश टापरे यांनी प्रास्ताविक करताना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक संतोष दारमोडे यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य पर्यवेक्षक श्री पांडे यांनी केले. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, व सामान्य रुग्ण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.