न्यूज डेस्क : केंद्र सरकारमधील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी डिझेल वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी कर लावण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला देण्याच्या विचारात आहेत. ज्याचा उद्देश बहुतेक कार खरेदीदारांना ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या वाहनांकडे वळवणे हा आहे. नितीन गडकरी यांनी या कराला प्रदूषण कर असे नाव दिले आहे. त्यांच्या मते, देशातील डिझेल वाहने कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणले, “2014 नंतर, 52% (संख्या) डिझेल वाहनांची संख्या 18% पर्यंत कमी झाली. आता ऑटोमोबाईल उद्योग वाढत असताना, डिझेल वाहने वाढू नयेत. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घ्या जेणेकरून डिझेल (वाहन) कमी होईल. जर तसे झाले नाही तर मी अर्थमंत्र्यांना शिफारस करेन की डिझेलमुळे खूप प्रदूषण होत आहे त्यामुळे त्यावर 10% अतिरिक्त कर लावला जावा,” असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
देशातील डिझेल इंजिन वाहनांवरील जीएसटी 10 टक्क्यांनी वाढवावा, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पत्र तयार केले आहे. जे ते केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना देणार असल्याची माहिती मिळत आहे.