अमरावती : महसूल विभागाच्या पाठोपाठ भ्रष्ट्राचारामध्ये बदनाम असलेला नगर रचना विभाग हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निशाण्यावर आला असून या विभागाच्या वर्ग 2 च्या अधिकाऱ्याला 7,500 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले. परमेश्वर पांडुरंग गाडगीळ वय वर्ष 31 रा अमरावती असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या विरुद्ध गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे सिव्हिल इंजिनिअर असून त्यांच्या कडे असलेले क्लायंट चे शेतचे वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषकचे ऑनलाइन प्रकरण पुढे पाठवण्याकरिता अलोसे यांनी 20,000/- ची लाचेची रक्कम मागितली दि.11/09/2023 रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान 7500/- रु. लाचेची मागणी केली. दिनांक 11/09/20230 रोजी पंचासमक्ष आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक परमेश्वर पांडुरंग गाडगीळ वय -31 वर्ष, रचना सहाय्यक यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 7500/- रु. पंचासमक्ष स्विकारली वरुन आज रोजी वर नमुद आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुध्द पो.स्टे. गाडगे नगर जि.अमरावती येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मार्गदर्शन
मा.श्री.मारुती जगताप,
पोलीस अधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र,अमरावती.
1)श्री.देवीदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
2)श्री.शिवलाल भगत,पोलीस उपअधीक्षक,अमरावती घटक, अमरावती,
3) मिलींदकुमार बाहकर, पोलीस उपअधीक्षक,अमरावती घटक, अमरावती,
सापळा अधिकारी
पो. नि. सतिश उमरे
ला.प्र.विभाग,अमरावती
कारवाई पथक
पो.नि.सतिश उमरे, पोलीस अंमलदार प्रमोद रायपूरे, विनोद धुळे, राहुल वंजारी, आशिष जांभोळे, शैलेश कडु यांनी यशस्वीपणे पार पाडली.
सक्षम अधिकारी
अप्पर मुख्य सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई