Wednesday, October 30, 2024
HomeMarathi News TodayAsia Cup च्या सुपर 4 चे अंतिम वेळापत्रक जाहीर...उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान...

Asia Cup च्या सुपर 4 चे अंतिम वेळापत्रक जाहीर…उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान…

Asia Cup – काल हाँगकाँगवर पाकिस्तानच्या शानदार विजयानंतर आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 टप्प्याचे वेळापत्रक समोर आले आहे. पाकिस्तानने शुक्रवारी हाँगकाँगवर 155 धावांनी दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. सुपर 4 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका पाकिस्तान हे संघ पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश आणि हाँगकाँगला पहिल्या टप्प्यात एकही सामना जिंकता न आल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अ गटातून भारत आणि पाकिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत, तर ब गटातून अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान गटात अपराजित राहिले आहेत.

सुपर 4 च्या चार संघांची नावे स्पष्ट झाल्यानंतर अंतिम वेळापत्रकही समोर आले आहे. या टप्प्यात सर्व संघांना प्रत्येक संघाविरुद्ध राऊंड रॉबिनच्या आधारे एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 मधील पहिला सामना आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे, तर भारत 4 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

आशिया कप 2022 सुपर-4 वेळापत्रक

3 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका
4 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
6 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
7 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
8 सप्टेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान

सुपर 4 चे सर्व सामने IST संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: