नांदेड – महेंद्र गायकवाड
महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.११ सप्टेंबर रोजी आयुक्त यांचे बैठकी कक्षात ( मीटिंग हॉल ) येथे सार्वजनिक गणेश उत्सव – २०२३ बाबत महापालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक घेतली.
मनपा आयुक्त डोईफोडे यांनी बैठकीमध्ये क्षेत्रीय अधिकारी यांना आपल्या क्षेत्रातील घरगुती श्री मुर्ती विसर्जनासाठी त्या त्या भागात पर्यावरण पुरक हौंद तयार करण्याच्या जागा निश्चित कराव्यात जेणे करून नागरिकांना श्री मुर्ती विसर्जन करणे सोयीचे जाईल, यासाठी श्री गणेश मंडळे,एनजीओ, परिसरातील माजी स.सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेऊन नागरिकांना आपल्या घराजवळील पर्यावरण पुरक हौदात श्री विसर्जन करण्यास प्रोत्साहित करावे असे निर्देश दिले.
बैठकीत सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेची परवानगी देताना नियमांचे करा, रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत कटाक्षाने लक्ष द्या, पर्यावरण पुरक तलाव व मोठ्या श्री मुर्ती विसर्जनाची माहिती घेऊन त्या विसर्जन ठिकाणी जीवरक्षक दल,शुध्द पिण्याचे पाणी,विद्युत व्यवस्था ,क्रेन ,कॅमेरे यांची चोख व्यवस्था, निर्माल्य संकलन याबाबत योग्य नियोजन करा. असे निर्देश दिले.
तसेच स्वच्छता विभागाने विशेष सफाईवर विशेष लक्ष द्यावे, पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवा, सर्वांनी समन्वयाने कामे करा, विसर्जन ठिकाणी व मिरवणुक मार्गातील खड्डे बुजवा ,वाहान पार्किंग ची व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करा, मोकाट जनावरांमुळे नागरिकास व रहदारीस अडथळा होणार नाही याचे नियोजन करा, अशा सुचना आयुक्त डॉ.डोईफोडे यांनी दिल्या सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी श्री विसर्जन हे रात्री उशीरा पर्यंत चालते त्यासाठी विसर्जन स्थळी कर्मचारी नियुक्ती करताना त्यांच्या कामाच्या वेळा वाढवा अशा सूचना केल्या.
या बैठकीस उपायुक्त निलेश सुंकेवार,उपायुक्त कारभारी, दिवेकर,सहा.आयुक्त गुलाम मो.सादेख,विधी अधिकारी अजितपालसिंघ संधु, सहा.आयुक्त कर सदाशिव पतंगे, अ.ले.प. सुधीर इंगोले, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, क्षेत्रीय अधिकारी इतवारा रावण सोनसळे, सिडको डॉ.रईसोद्दीन , साबांवि चे कार्यकारी अभियंता रफतऊल्लाह खान यांच्या सह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.