Friday, November 22, 2024
Homeराज्यसचखंड गरूव्दारा बोर्ड कायदा कलम ११ चे संशोधन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

सचखंड गरूव्दारा बोर्ड कायदा कलम ११ चे संशोधन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास अनेकांचा पाठिंबा…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड येथील शीख समाजाची धार्मिक संस्था गुरुव्दारा सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब नांदेडचा कायदा 1956 मध्ये महाराष्ट्र शासनाने दि. 18/02/2015 ते दि. 17/04/2015 रोजी कलम 11 मध्ये संशोधन करून संस्थेवर थेट अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू केली.

प्रत्यक्षात स्थानिक शीख समाजाची तशी मागणी नव्हती किंवा बोर्ड सदस्यांचाही ठराव नव्हता. त्यामुळे शीख समाजात प्रचंड नाराजी आहे व मागील पाच वर्षापासून कलम 11 संशोधन रद्द व्हावे म्हणून आंदोलन सुरू आहे. गुरुव्दाराचे धर्मगुरू (पंचप्यारे साहिबान), संत बाबा बलविंदरसिंघजी (कारसेवावाले), सचखंडवासी संत बाबा प्रेमसिंघजी 96 करोडी मातासाहेबवाले यांनी धरणे, उपोषण आंदोलने केली, परंतु शासनाने वारंवार आश्वासन देवूनसुध्दा कलम 11 चे संशोधन रद्द केले नाही.

यासाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी, दि. 11 सप्टेंबर रोजी लोकशाही पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे, नानकझिरा साहेब बिदर कर्नाटक गुरूद्वाराचे अध्यक्ष बलबिरसिंघ यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी केले. यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या धरणे आंदोलनानंतरही शीख समाजाची मागणी पूर्ण न झाल्यास येणार्‍या काळामध्ये जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, आमरण उपोषण शीख समाजाच्या वतीने करण्यात येईल,

असा इशाराही सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या धरणे आंदोलनात बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डुसिंघजी महाजन, शेरसिंघ फौजी, सुरेंद्रसिंघ मेंबर, गुरचरणसिंघ घडीसाज, मा. सचिव रणजितसिंघ कामठेकर, मा.सचिव रविंद्रसिंघ बुंगई, भागिंदरसिंघ घडीसाज, मा. सदस्य देवेंद्रसिंघ मोटरावाले, माजी महापौर मा. सचिव बलवंतसिंघ गाडीवाले,

मोटर मालक संघाचे अध्यक्ष सुखविंदरसिंघ हुंदल, मा.सदस्य गुरमीतसिंघ महाजन, मा.सदस्य मनप्रितसिंघ कुंजीवाले, मा.सदस्य जसपालसिंघ लांगरी, मा.सदस्य राजेंद्रसिंघ पुजारी, मा.सदस्य जरनैलसिंघ गाडीवाले, माजी नगरसेवक संदिपसिंघ गाडीवाले, माजी नगरसेवक खेमसिंघ ग्रंथी, माजी गुरुव्दारा बोर्ड अधीक्षक संतसिंघ संधु,

मा. अधिक्षक रणजितसिंघ चिरागीया, माजी उपआयुक्त जगजीतसिंघ चिरागीया, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, महेंद्रसिंघ लांगरी, सामाजिक कार्यकर्ते बिरेंदरसिंघ बेदी, महेलसिंघ लांगरी, बंदीछोडसिंघ खालसा, परशनसिंघ महंत, प्रहार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रितपालसिंघ शाहु, शिवसेनेचे दर्शनसिंघ सिध्दु, पत्रकार रविंदरसिंघ मोदी, शिवसेनेचे रंजितसिंघ गिल,

सामाजिक कार्यकर्ते जसबीरसिंघ बुंगई, काँगेसचे तेजपालसिंघ खेड, शिवसेनेचे अवतारसिंघ पेहरेदार, भाजप चे गुरप्रितसिंघ सोखी, सामाजिक कार्यकर्ते- राजेंद्रसिंघ शाहु, अवतारसिंघ गल्लीवाले, दिपकसिंघ गल्लीवाले, शिवसेनेचे मनिंदरसिंघ राज रामगडीया, सामाजिक कार्यकर्ते लड्डुसिंघ काटगर, सामाजिक कार्यकर्ते मनप्रितसिंघ कारागीर,

सामाजिक कार्यकर्ते अमरजीतसिंघ महाजन, सामाजिक कार्यकर्ते राजकमलसिंघ जक्रेवाले, आम आदमी पक्षाचे शहरअध्यक्ष नरेंद्रसिंघ ग्रंथी, नारायणसिंघ वासरीकर (पहेलवान), बलवीरसिंघ बुंगई, प्रेमजितसिंघ शिल्लेदार, काँग्रेसचे हरजिंदरसिंघ संधु, हरजिंदरसिंघ कामठेकर, गुरप्रितसिंघ ग्रंथी, मनसेचे विक्कीसिंघ कारपेंटर, नरेंद्रसिंघ बुंगई, भाजपचे सिख सेलचे किरपालसिंघ हजुरीया, भाजपचे जसबीरसिंघ धुपीया, भाजपचे हरभजनसिंघ पुजारी,

सामाजिक कार्यकर्ते हरभजनसिंघ दिक्षवा, सामाजिक कार्यकर्ते कश्मीरसिंघ भट्टी, केहरसिंघ नालेवाले, सरदार इंदरसिंघ, हरभजनसिंघ पहरेदार, बक्शीसिंघ पुजारी, राणासिंघ चंदन, सुरेंद्रसिंघ उप्पल, विक्रमसिंघ फौजी, देविंदरसिंघ रामसिंघ, दलबीरसिंघ, तेजवंतसिंघ, गुरदेवसिंघ रामगडीया, प्रेमज्योतसिंघ सुखई, रतनसिंघ त्रिकुटवाले व अन्य शीख समाज बांधव सहभागी झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: