Friday, November 22, 2024
Homeक्रिकेटजसप्रीत बुमराह बाप बनला तर शाहीन आफ्रिदीने दिले हे गिफ्ट...प्रेमाने भारावून गेलेला...

जसप्रीत बुमराह बाप बनला तर शाहीन आफ्रिदीने दिले हे गिफ्ट…प्रेमाने भारावून गेलेला बुमराह काय म्हणाला?…

न्युज डेस्क – सध्या आशिया कप श्रीलंकेमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. काल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन आफ्रिदीने बाप बनला म्हणून एक गिफ्ट दिलंय. यादरम्यान दोघांमध्ये झालेल्या सवांदही कॅमेऱ्यात कैद झालेत. आणि त्यावर बुमराह याने X वर शाहीन आफ्रिदीचे आभार मानत जे लिहले त्यामुळे पोस्टवर पाकिस्तानी चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव सुरु झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने x.com वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आफ्रिदी आर प्रेमदासा स्टेडियमवर बुमराहला भेट देताना दिसत आहे. त्याने आपल्या पहिल्या मुलाच्या अंगद जसप्रीत बुमराहच्या जन्माबद्दल भारतीय वेगवान गोलंदाजाचे अभिनंदन केले आणि त्याला काही भेटवस्तू दिल्या. आफ्रिदीने त्याच्या अधिकृत X हँडलवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शाहीनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले – प्रेम आणि शांती. तुमच्या मुलाच्या जन्माबद्दल जसप्रीत बुमराह आणि त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन. सर्व कुटुंबासाठी प्रार्थना. आम्ही मैदानावर लढतो. मैदानाबाहेर आपण फक्त माणसं आहोत. प्रत्युत्तरात बुमराहने शाहीनचे कौतुक केले आणि म्हणाला- सुंदर हावभाव, मी आणि माझे कुटुंब या प्रेमाने भारावून गेलो आहोत! सदैव शुभेच्छा. यावर पाकिस्तानी चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बुमराहच्या प्रतिक्रियेने सर्वजण खूश आहेत.

शाहीनच्या ट्विटला 50,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत, तर बुमराहच्या रिप्लायला अर्ध्या तासात 20,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सुपर फोर फेरीचा सामना रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झाला होता मात्र तो अजूनही पूर्ण झाला नाही.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 24.1 षटकात 147/2 धावा केल्या, जेव्हा पावसाने खेळात व्यत्यय आणला. आज पाकिस्तानी संघ बुमराह मैदानात उतरल्यावर त्याला कसा खेळवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: