दहा दिवसाच्या उत्सवाचा आनंदात समारोप
अमरावती – मागील दहा दिवसापासून महानगर तांड्यात सुरू असलेल्या आणि बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख असलेल्या ‘तीज’ महोत्सवाची सांगता (दि.१०)रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आली. श्रावण महिन्यात असलेला “तीज” महोत्सव म्हणजे अविवाहीत मुलींच्या जीवनातील आनंद पर्व,यासाठी बंजारा समाजातील प्रत्येक कुटूंबातील विशेषता महिला व मुली एकत्र येऊन दहा दिवस आनंदाने तीज उत्सव साजरा करतात यामुळे सामाजिक बांधिलकी वाढत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयसिंग राठोड यांनी केले.
“मन लोवडी दरादरे वीर, आज म चाली रं……….” या गाण्याच्या ओळी अनेक वर्षापासून मनाला चटका लावून जातात. आता आपण पुन्हा वर्षभर भेटणार नाही, ही विरहाची जाणीव, तर पुन्हा भेटीची उत्कटता, त्यातून व्यक्त होते. अमरावती शहरात वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षण याकरिता स्थायिक झालेला बंजारा समाज आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपतो आहे. परंपरेप्रमाणे तांड्याचे नायक सुभाष चव्हाण, यांच्या घरून दिनांक ३० ऑगष्ट २०२३ रोजी “तीज” महोत्सवाला तीजरोपण करून सुरुवात करण्यात आली होती.
शंकरनगर, अर्जुननगर, व्हीएमव्ही परिसर, रविनगर, मंगलधाम परिसर व एसआरपी कॅम्प या भागात आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात शहरातील शेकडो महिला व मुली सहभागी झाल्या होत्या. गायीगुरांचे पालन करणारा बंजारा समाज असल्याने श्रीकृष्णाची श्रद्धेने पुजा केली जाते. तसेच दिनांक ९ सप्टेंबर,२०२३ रोजी गणगौर / ढंबोळीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पारंपारिक नृत्य-गाणे सादर करून श्रीकृष्ण व राधेची पूजा करण्यात आली. त्यानंतर काल दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी संस्कार लॉन, अमरावती येथे या उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी बोलतांना उदयसिंग राठोड म्हणाले की, बंजारा समाज हा मुळातच कष्टकरी समाज आहे.या समाजाने अपार कष्टाचे फलित म्हणजे देशाचा व्यापार लदेणी काळात वाढविला. देशाच्या तत्कालीन समाजव्यवस्थेला जिवंत ठेवण्याचे काम या समाजाने केले.
रात्रंदिवस राबत भटकंती करतांना श्रमपरिहारासाठी लोकगिते निर्माण केली. “तीज” उत्सवात गायली जाणारी गीते याची साक्ष देत असल्याचे यावेळी ते म्हणाले.बंजारा सण व उत्सव यातुन बंजारा लोकजीवन व संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे यावेळी सेवानिवृत्त जिल्हानियोजन अधिकारी श्याम चव्हाण म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर तांड्याचे नायक सुभाष चव्हाण, कारभारी शंकर चव्हाण, कारभारी, डॉ.अमरसिंग राठोड, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक राम पवार,सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक चंदनसिंग राठोड, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी शाम चव्हाण, डॉ जयवंत वडते,जयसिंग राठोड,प्रविण राठोड, दादाराव चव्हाण, उपकुलसचिव ज्ञानेश्वर राठोड,मोतीलाल जाधव,अजाबराव राठोड, हिरालाल जाधव, हासाबी मनोहर चव्हाण, नसाबी राम आडे,आसामी बालकदास जाधव, विनोद पवार,सुहास चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तांड्याचे नायक सुभाष चव्हाण यांनी उत्सवाची पूर्वपीठिका सांगून त्याची सुरुवात कशी झाली.तसेच या दहा दिवसात कार्यक्रमाचे आयोजन कसे करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला तांड्याची नायकंळ अनिता चव्हाण, कारभारणी योगिता चव्हाण, अनिता पवार,शशिकला जाधव,पार्वती राठोड, संजीवनी राठोड,संगीता वडते, सरिता राठोड,बेबी राठोड,शोभा चव्हाण,सुनिता राठोड, विमल राठोड, विमल आडे,
सुरेखा जाधव,राविताआडे, निरू जाधव, प्रेमा चव्हाण,बेबीताई पवार, मिरा चव्हाण, सावित्री जाधव,मालती राठोड,पुष्पा जाधव,वनिता चव्हाण, लता राठोड,शांता राठोड,जयश्री राठोड, ललीता राठोड, प्रिती राठोड,किरण राठोड,बबिता राठोडसह मोठ्या संख्येने बंजारा भगिनी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला एका सुत्रात गुंफण्याचे काम मोहन चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन तांड्याचे कारभारी डॉ. शंकर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेकांनी परिश्रम घेतले.