Monday, November 25, 2024
HomeSocial TrendingIND vs PAK | भारत-पाकिस्तान सामन्यात या पाकिस्तानी खेळाडूचे सोशल मिडीयावर होत...

IND vs PAK | भारत-पाकिस्तान सामन्यात या पाकिस्तानी खेळाडूचे सोशल मिडीयावर होत आहे कौतुक…Video Viral

IND vs PAK : आशिया कपच सध्या सुपर फोरचे सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोमध्ये सुरु आहे. सध्या तरी पावसामुळे हा सामना थांबला असून मात्र पाकिस्तानी खेळाडू फखर जमान Fakhar Zaman अचानक सोशल मीडियावर जोदार चर्चा सुरु झाली. पाउस आल्यानंतर तो ग्राउंड स्टाफला मदत करताना दिसला. Fakhar Zaman फखरने कर्मचार्‍यांसह ग्राउंड झाकण्यास सुरुवात केली. कोलंबोमध्ये नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान सामना थांबेपर्यंत भारताने 24.1 षटकात 147 धावा केल्या होत्या.

आज कोलंबोमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी हवामान स्वच्छ होते. मात्र टीम इंडियाचा जवळपास निम्मा डाव संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. हे पाहून कोलंबोचे आर. प्रेमदास स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी मैदान झाकण्यास सुरुवात केली. यावेळी फखरने ग्राउंड स्टाफला मदत केली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह मैदानावर आच्छादन टाकण्यास सुरुवात केली. फील्ड कव्हर करण्यासाठी वापरलेले कव्हर्स खूप भारी आहेत. ग्राउंड झाकण्यासाठी अनेक लोकांची गरज असते मात्र त्यांना मदत म्हणून Fakhar Zaman स्वतः सरसावला.

फखरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये तो कर्मचाऱ्यांना मदत करताना दिसत आहे. फखरच्या या स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानसोबतच भारतीय चाहतेही Fakhar Zaman फखरचे कौतुक करत आहेत.

वृत्त लिहेपर्यंत सामना थांबला असून भारताने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत. शुभमन गिल ५८ धावा करून बाद झाला तर रोहित शर्मा ५६ धावा करून बाद झाला. वृत्त लिहिपर्यंत विराट कोहली 8 धावा करून नाबाद राहिला आणि केएल राहुल 17 धावा करून नाबाद राहिला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: