मूर्तिजापूर – जागतिक शांती आणि सदभावनेसाठी माध्यमाद्वारे सशक्तिकरण या विषयाला अनुसरून दि. ८ ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन राजयोग शोध आणि प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान मीडिया द्वारा करण्यात आले आहे.
यामध्ये मुर्त्यापुर तालुक्यातील पत्रकारांचा देखील समावेश असून संमेलनाकरिता पत्रकार मंडळी रवाना झाली आहे.जागतिक शांती आणि सदभावनेसाठी माध्यमांद्वारे सशक्तिकरण या मुख्य विषयावर देशभरातील संपादक,पत्रकार,मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी,
जाहिरात क्षेत्र, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदितील प्रतिनिधींचा यात सहभाग राहणार आहे. राष्ट्रीय संमेलनाकरिता तालुक्यातील पत्रकार विलास नसले, ग्रामीण पत्रकार संघाचे वाशीम जिल्हाध्यक्ष अशोकराव उपाध्ये,राज्याचे कोषाध्यक्ष गजानन हरणे,तालुकाध्यक्ष अतुल नवघरे,
अँड.निलेश सुखसोहळे,जयप्रकाश रावत,अनिल भेंडकर,प्रसिद्धी प्रमुख सुमित सोनोने,संतोष माने,धनराज सपकाळ,आकाश जामणिक,गजानन गवई,सागर क्षीरसागर,प्रविण ढगे आदी पत्रकार रवाना झाले आहेत .