आकोट – संजय आठवले
आकोट परिसरात प्रतिबंधित पान मसाल्याची सर्रास विक्री होत असल्याने यासंदर्भात आकोट ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित पान मसाल्यासह ८ लक्ष रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या ऐवजासह अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
दि.३१/०८/२०२३ रोजी अकोट ग्रामीण पोलिस अकोला मार्गावर गस्त घालित होते. त्यावेळी गोपनिय बातमीदाराकडुन त्यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, अकोला कडून आकोटकडे एक पांढ-या रंगाचे महिंद्रा बोलेरो पिक हे वाहन शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला गुटखा घेवून येत आहे.
अशा खात्रीलायक बातमीवरून विजयनगर, बस स्टॉप अकोला मार्ग, आकोट येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यावेळी गोपनिय बातमीत वर्णन केलेले वाहन अकोलाकडून येतांना दिसले. ते वाहन थांबविण्यात आले. या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला एकून किंमत २,००,९२५/रु आढळून आला. हा गुटखा जप्त करण्यात आला.
त्यासोबतच या गुटख्याची वाहतुक करणारी एक पांढ-या रंगाची बोलेरो पिक अप के. एमएच ३० बीडी २००१ किं. ६,००,०००/रु हे वाहनेही ताब्यात घेण्यात आले. अशा एकूण ८,००,९२५/रु मालासह आरोपी नामे अब्दुल सादीक अब्दुल रफीक, वय २३ वर्षे आंबेडकर नगर, शिवनी, अकोला व मजहर अली अयुब अली वय २७ वर्षे, रा. हाजीनगर,
शिवनी, अकोला यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस स्टेशन आकोट ग्रामीण जि. अकोला येथे आरोपीविरूद अपने ३४६ / २०२३ कलम ३२८. १८८, २७२, २७३, ३४ भादवी सह कलम २६ (२) (i), (iv), २० (३) (d), (e) ३० (२) (अ) अन्न सुरक्षा मानक अधिनियम प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली परि. सहायक पोलीस अधिक्षक तथा ठाणेदार सुरज गुंजाळ, पोउपनि विजय पंचबूद्धे, विष्णु बोडखे, एएसआय मनोज कोल्हटकर, पोहेकॉ मोतीराम गौडचवर, नापोकाॅं भाष्कर सांगळे, पो. कॉ. कांताराम तांबडे ,
पो. कॉ. शशिकांत इंगळे, पोकाॅं शैलेश जाधव यांनी केली. घटनेतील आरोपींना आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे.