Friday, October 25, 2024
Homeराज्यभदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा ८९ वा वाढदिवस उत्साहात साजरा...

भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा ८९ वा वाढदिवस उत्साहात साजरा…

मनसर येथील मंजुश्री बुद्धविहार येथे वाढदिवसाचे आयोजन

रामटेक – राजु कापसे

मनसर येथील मंजुश्री बुद्धविहार येथे आज दि. ३१ ऑगस्ट ला भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा ८९ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बुद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसर येथील बुद्ध विहारात आज दि. ३१ ऑगस्ट ला सकाळी ९.०० वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदना घेण्यात आली. नंतर बाईक रैली काढून मनसर चौक ते मंजुश्री बुद्धविहार येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

बुद्ध विहारात वंदना झाल्यावर भंदत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. अनुयायांना भोजन दान करण्यात आले. यावेळी भंदत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना वाढिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दीपक सहारे,सोनू चव्हाण,नीरज बांगरे,

समीर घरडे, आनंद पाटील ,अमित अंबादे,राजेश सांगोडे,मनीष खोब्रागडे,भाऊराव भेलावे,राहुल जोहरे सर,ओमकार खोब्रागडे, प्रयाश थावरे,अवी बागडे, गौरव रामटेक, सूरज भिमटे, रवींद्र मेश्राम,जगदिश सांगोडे तसेच महिला संघ मनसर तसेच विविध संघ व असंख्य बुद्ध उपासक उपासिका आदी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: