दानापूर – गोपाल विरघट
हिंदू संस्कृतीमधील पवित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दानापूर येथे महा कावड महोत्सव अतिशय आनंद उत्साहात साजरा केला गेला. कावळ यात्रेत प्रमुख आकर्षण म्हणून श्री. चंद्रमौलेश्वर कावळ मंडळ, महाकाल कावळ मंडळ, मरिमाता कावळ मंडळ या मोठ्या मंडळासह हजारो शिवभक्त आणी कावळधारी युवकांनी सहभाग घेतला होता.
“हर हर महादेव ” च्या गजराने दानापूर नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. दानापूर येथील गरुड धाम (उत्तर विभाग) येथील महादेव मंदिर येथे आरती करून . चंद्रमौलेश्वर कावळ मंडळ यांनी कावळ यात्रेला सुरवात केली. संपूर्ण गावातून वाजत गाजत कावळ यात्रा निघाल्या.
शिवभक्तासाठी दानशूर व्यक्ती, विविध संघटना मार्फत चहा,पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कावळ यात्रेदरम्यान विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर मंडळीनी, तसेच गावकऱ्यांनी कावड यात्रेचे पूजन केले. गावातील प्रत्येक मंदिरात जलाभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी कावड यात्रे दरम्यान हिवरखेड पोलीस स्टेशनचे प्रवीणकुमार गवळी, चव्हाण पोलीस पाटील संतोष माकोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.