दिरंगाई व शिस्तभंगासाठी बडगा उगारल्याने कर्मचारी वठणीवर…
अहेरी : वारंवार सांगून व सूचना देऊनही उपविभागीय अधिकारी येथील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पोहचत नसल्याने नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या दालनाला सकाळी पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास कुलुप ठोकले. त्यामुळे अन्य शासकीय कार्यालयात व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे कार्यालयीन वेळेत ग़ैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही दिसत आहे.