Friday, November 22, 2024
Homeराज्यसाहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन...

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन…

पातूर – निशांत गवई

लहुजी शक्ती सेना पातूर व बाळापूर तालुक्याचे वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचि 103 व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार माननीय श्री बळीरामजी शिरसकर यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडे दाखवून करण्यात आली व मातंग समाज मेळावा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विष्णू कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला मेळाव्याचे उद्घाटक माननीय आमदार श्री नितीन बापू देशमुख होते प्रमुख उपस्थिती परमपूज्य सद्गुरु श्री गजानंद माऊली हे होते.

असंख्य समाज बांधव उपस्थित होते पाहुणे म्हणून लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ प्रभारी श्री वामनरावजी भिसे अण्णाभाऊ साठे क्रांती भूमीचे अध्यक्ष मातंग समाजभूषण श्री प्रभाकर लांडगे अण्णाभाऊ साठे क्रांती भूमीचे सचिव प्रमोद घोडे लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण महानगर अध्यक्ष प्रकाश दांडगे अकोला युवा अध्यक्ष राहुल तायडे युवा नेते श्रीमंगल डोंगरे पातुर तालुकाध्यक्ष अजय अवचार बाळापुर तालुका अध्यक्ष राजेश गायकवाड हे होते.

कार्यक्रमाचे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मिरवणूक व मेळाव्याचे आयोजक श्री श्री वासुदेवराव डोलारे प्रदेश कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना श्री विष्णू भाऊ शेलारकर अकोला जिल्हा प्रभारी श्री प्रमोद घोडे सचिव साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे क्रांती भूमी भंडारा फाटा उत्सव समिती, सुरज झडपे प. स. सदस्य, भास्कर अंभोरे प. स. सदस्य श्री रामेश्वर नावकर उपाध्यक्ष श्री पवन नवकार सचिव दीपक शिंदे श्री अजय वानखडे पातुर शहराध्यक्ष लहुजी शक्ती सेना हे होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: