Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा 14 वा सामना असेल. यापूर्वी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा आहे याबद्दल सांगणार आहोत.
7 वेळा भारताने 5 वेळा पाकिस्तानवर विजय मिळवला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 13 सामन्यांमध्ये टीम इंडियाने सात वेळा विजय मिळवला आहे, तर पाच वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर आशिया चषकातही टीम इंडियाचे पारडे पाकिस्तानवर जड दिसत आहे. आणि आता दोन्ही संघ 14व्यांदा आमनेसामने येणार आहेत.
विशेष म्हणजे आशिया चषक स्पर्धेत चॅम्पियन बनण्यासोबतच सामना जिंकण्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या पुढे दिसतो. दोन्ही संघांनी आतापर्यंत 12 आशिया चषक स्पर्धा खेळल्या आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 6 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे. टीम इंडियाने 1984, 1988, 1990, 1995, 2010 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने 2000 आणि 2008 मध्ये विजेतेपद पटकावले आहे.
रोहित-बाबर कर्णधारपदाची धुरा सांभाळतील
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना श्रीलंकेतील तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. जिथे टीम इंडियाची कमान हिटमॅन रोहित शर्माकडे असेल. तर पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत दोन्ही संघ यावेळीही एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसत आहेत. अशा स्थितीत ही स्पर्धा रंजक होण्याची अपेक्षा आहे.