विदयार्थ्यांनी अनुभवले चांद्रयान 3 चे लँडिंग
पातूर – निशांत गवई
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे चांद्रयान -3 ची प्रतिकृती साकारून विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी चांद्रयान -3 ची लँडिंग चा अनुभव घेतला.
नुकतेच भारताच्या इस्रोच्या शास्त्रज्ञानी चांद्रयान -3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. ही बाब भारतीयांसाठी अभिमानस्पद आहे. या मोहिमेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे चांद्रयान -3 ची प्रतिकृती साकारण्यात आली.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रतिकृतीच्या माध्यमातून व व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया दाखवून समजावून सांगण्यात आली.
प्रतिकृती उमेश थोटे सर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. यावेळी रविकिरण अवचार, नरेंद्र बोरकर, चंद्रमणी धाडसे,कृष्णा खुरसडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, उमेर अहमद, हरिष सौंदळे, अविनाश पाटील, पल्लवी पाठक, नितु ढोणे, लक्ष्मी निमकाळे, तृप्ती पाचपोर, अश्विनी आवटे, नयना हाडके, प्रियंका चव्हाण, अश्विनी अंभोरे, शीतल कवडकर, योगिता देवकर, बजरंग भुजबटराव, प्रिती हिवराळे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.