रामटेक – राजू कापसे
मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी लोधीखेडा येथुन रामटेक येथील आपल्या भावाच्या घरी आलेल्या ४५ वर्षीय महिलेचे स्वगावी परत जातांना बसमध्ये चढतेवेळी बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना २३ ऑगस्ट च्या दिवशी दुपारी १.१५ वाजता दरम्यान रामटेक बसस्थानकावर घडली.
सौ. योगीता मनोहर साखरकर वय ४५ वर्षे रा. लोंधीखेडा ता. सौसर जि. छिंदवाडा म.प्र असे पिडीतेचे नाव असुन ती रामटेक येथे तिचे मोठे भाऊ गणेश रामाजी पुंडे रा. विद्यानगरी परसोडा रामटेक यांच्या कडे मंगळागौरीचा कार्यक्रमासाठी एकटीच दि. २२ ऑगस्ट रोजी लोधीखेडा येथून एसटी बस ने रामटेक येथे आली होती.
सदर कार्यक्रमामध्ये अंगावर घालण्याकरिता तिने मंगळसूत्र, कानातले, नथ, अंगठी सोबत आणली होती. सदर चे सोने हे महिलेच्या लग्नातील असुन गेले २० वर्षा पासुन तिच्या जवळच होते. दि. २३ ऑगस्ट रोजी लोधीखेडा गावाला जाण्याकरिता रामटेक बस स्टॉप येथे दुपारी 01/15 वा दरम्यान आली होती.
रामटेक बस स्टॉप येथे गेले २ तासापासुन बस नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नंतर रामटेक- सावनेर बस दुपारी २.४५ वा दरम्यान लागल्याने महिला बस मध्ये चढली व बस मध्ये बॅग मधुन पाण्याची बॉटल काढण्या गेली असता बॅग ची चेन निघाली असल्याची दिसली व बॅग मध्ये असलेली सोन्याची डब्बी दिसुन आली नाही.
महिलेने बस मध्ये आजु बाजुला डब्बीचा शोध घेतला असता मीळुन आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने ती डब्बी काढुन घेतली. डब्बी मध्ये 1)13 ग्रॅम पोत किंमत 32,000 रू. 2)2 ग्रॉमची नथ किंमत 5000 रू.3) 4 ग्रॅम अंगठी किंमत 10000 रू 4) कानामधील रिंग 1 ग्रॅम 2500 असे एकुण 20 ग्रॅम सोन्याचे किंमती 49,500 रू. माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला. तेव्हा महिलेने पोलीस स्टेशन रामटेक येथे तिचे मोठे भाऊ गणेश रामाजी पुंडे यांचे सोबत रिपोर्ट दिली.