पातूर – निशांत गवई
पातूर – शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नातं हे घट्ट असते. विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षकांसोबत जातो. त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना एक जिव्हाळा निर्माण होतो. मात्र, जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षकाची बदली होते; तेव्हा विद्यार्थ्यांचे हृदय आपसूकच गहीवरून येते. असाच प्रकार पातूर तालुक्यातील जि. प. केंद्रीय आंतरराष्ट्रीय आदर्श शाळेमध्ये घडला आहे.
आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांनाच नाहीतर ग्रामस्थांनाही अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय जि. प. केंद्रीय प्राथ शाळा दिग्रस बु येथे सुरेश कातखेडे पदवीधर शिक्षक यांची प्रशासन नुसार ऑनलाईन बदली झाल्याचे निमित्ताने १५ आगस्ट रोजी निरोप देण्यात आला.
२००६ रोजी सुरेश कातखेडे पदवीधर शिक्षक यांची दिग्रस बु येथे नियुक्ती झाली होती आज पर्यत एकूण १७ वर्षाचा काळ यांनी या ठिकणी विद्यार्थ्यां सोबत घालविला आणि चक्क विद्यार्थ्यांना हृदयामध्ये जागा करून निघून गेले आहेत.१७ वर्षांमध्ये यांनी कृती, कर्तृत्व, प्रेम, जिव्हाळ्याने विद्यार्थ्यांची मनेच नाहीतर संपूर्ण गावलाच आपलंसं केलं.
सुरेश कातखेडे पदवीधर शिक्षक यांनी शाळेतील मुलांनाच आपले मानून शाळा सुटल्यानंतर सुद्धा त्यांनी अधिकचे तास घेत असत आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात तरबेज केले होते., जिल्ह्यात पहिली आंतरराष्ट्रीय आदर्श शाळेचा मान आहे.
निरोप समारंभ होत असताना सर्व मुली व मुले भावुक होऊन विद्यार्थी…..सर जाऊ नका, असे म्हणत आपल्या लाडक्या गुरुजी ला मिठी मारून रडत होते. मुख्याध्यापक संजय बरडे यांना सर्वात दिर्घ १४ वर्षाचा सहवास लाभल्यामुळे श्री. कातखेडे सरांना निरोपाच्या वेळी मुख्याध्यापक भाऊक झाल्यामुळे त्यांना एक शब्द सुद्धा बोलता आला नाही.
यावेळी उपस्थित सौ.कातखेडे, मुख्याध्यापक संजय बरडे, सुभाष टोळे,अनंत वाघ, सुनिल सरदार ,सरपंच आशा सुधाकर कराळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कल्पना गवई,उपाध्यक्ष बाजीराव ताले,सदस्य प्रमोद गवई, सुधाकर कराळे, रेखाताई खेडकर, देवानंद गवई,शाळेच्या शिक्षिका ओमलता उंबरकर,सुरेखा बीजवे, दिपाली अंबरकर, वंदना भामोद्रे, अनिता खडसे सर्व शिक्षिका, आदीचे विद्यार्थ्यासोबतच उपस्थित प्रत्येकाचे मन भरून आले व भावुक झाले होते.