रामटेक – राजु कापसे
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत माझी माती माझा देश हे अभियान जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शितलवाडी येथून झाली तर समारोप ग्रामपंचायत पंचाळा येथे नुकताच १४ ऑगस्टला झाला. या समारोपीय कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल जिल्हाधिकारी विपिन इटनकर जिल्हा परिषद च्या सीईओ सौम्या शर्मा , वनविभागाचे भारत हाडा, आर्मी कर्नल जोशी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवर तथा अधिकारी यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा नृत्याचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ सौम्या शर्मा यांनी केले त्यात त्यांनी पंचाळा येथील माती नवी दिल्ली ला जाणार असुन हर घर तिरंगा मोहीम आवर्जून राबवा असे उपस्थितांना संबोधन करीत सांगितले.
त्यानंतर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी शासनाच्या विविध योजना, माझी माती माझा देश अभियानाचे महत्त्व सांगत रामटेक पंचायत समीती यंत्रणेने ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान माझी माती माझा देश हे अभियान यशस्वीरित्या राबविले असल्याचे सांगीतले. कार्यक्रमात आदिवासी प्राविण्य प्राप्त १० वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. संचालन तथा आभार पंचाळा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी पवन उईके यांनी केले.
यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा परीषद सदस्य संजय झाडे, शांता कुमरे, सतीश डोंगरे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव , पं.स. सभापती नरेंद्र बंधाटे, ठाणेदार हृदयनारायण यादव, आर.एफ.ओ. अनील भगत सरपंच प्रगती माटे यांचेसह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.