नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड, देगलूर येथील यादू ऊर्फ यादव गंगाराम सोनकांबळे वय (25)या आरोपीने पत्नीस माहेरून हुंडयातील पन्नास हजार रुपये व मोटारसाईकल घेऊन ये म्हणून तिचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी आरोपीस बिलोली येथील मा. तदर्थ जिल्हा न्यायधीश -1 तथा अति. सत्र न्यायधीश वी. ब. बोहरा यांनी कलम 302 भा. द. वि. अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व दंड रुपये दोन हजार तसेच दंड न भरल्यास एक वर्षाचा सक्षम कारावास व कलम 498 -अ भा. द. वि. अंतर्गत तीन वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, बाबु पि. निवृत्ती घोडके वय ४५ वर्षे व्यावसाय शिक्षक रा. बोमनाळी ता. मुखेड जि. नांदेड यांची मुलगी नामे दिक्षा हिचे लग्न गंगाराम सोनकांबळे रा. आंबेडकर नगर देगलुर यांचा छोटा मुलगा नामे यादु उर्फ यादव सोबत दि. १० मे २०१७ रोजी रितीरिवाजाप्रमाणे झाले होते.
सदर लग्नामध्ये हुंडा म्हणून रु १,५०,००० व एक मोटारसाईकल पाच ग्राम सोन्याची अंगठी व संसार उपयोगी साहीत्य देण्याचे ठरले होते. परंतु लग्नामध्ये ठरलेल्या हुंडयातील रु ५०,००० व मोटारसाईकल देण्याचे राहीले होते.
दि. ३०.मार्च .२०१८ रोजी मयत दिक्षा हिला वरील आरोपी व त्याचे आई वडील भाऊ यांनी तुझ्या बापाकडे राहीलेले रु ५०,००० हुंडा व मोटारसाईकल आण असे म्हणुन शिवीगाळ व बेदम मारहाण केली होती. तसेच त्यानंतर सासरचे लोक वारंवार दर चार आठ दिवसाला हुंडयातील राहीलेले रु ५०,००० व मोटारसाईकल घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करीत जिवे मारण्याची देत होते.
दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी वरील आरोपीने मयत दिक्षा हिचा गळा आवळून खून केला. त्यामध्ये मयत दिक्षा हिचा मृत्यू झाला. मयत दिक्षा हिचे वडील बाबु पि. निवृत्ती घोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरील आरोपी विरुद्ध गुन्हा क्र. ३६७/२०१८ कलम ३०२, ३०४- ब, ४९८-अ, ३४ भा.द.वि. नुसार देगलूर पो. स्टे. येथे गुन्हा दाखल झाला. सदरिल गुन्हयाचा तपास प्रल्हाद भानुदास गिते सहाय्यक पो. निरिक्षक यांनी पुर्ण करुन दोषारोप पत्र मा. अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल केले.
सरकातर्फे एकूण ०५ साक्षीदार तपासण्यात आले. व मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन मा. न्यायधिशानी दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. एस. बी. कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पैरवी कर्मचारी पोलीस हेडकॉन्सटेबल माधव गंगाराम पाटील (ब. न. २४२३) पो. स्टे. देगलूर यांनी सहकार्य केले.