Sunday, September 22, 2024
Homeराज्यलोणाग्रा येथील शहीद सुमेध गवई यांची वीरमाता व वीरपिता यांचा सत्कार उरळ...

लोणाग्रा येथील शहीद सुमेध गवई यांची वीरमाता व वीरपिता यांचा सत्कार उरळ पोलीस स्टेशन मार्फत शिवसेनेचे जिल्हा संघटन उमेशभाऊ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला…

अकोला – अमोल साबळे

स्वतंत्र दिनानिमित्त उरळ पोलीस स्टेशन येथे अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत निंबा फाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व तसेच उरळ पोलीस स्टेशन हद्दीमधील देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना देश सेवेसाठी शहीद झालेले शहीद सुमेध गवई यांची लोणाग्रा येथील वीर माता व वीर पिता यांचा सत्कार उरळ पोलीस स्टेशन मार्फत शिवसेनेचे जिल्हा संघटन श्री उमेश भाऊ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेऊन कारगिल विजयी मेजर उमेश उत्तमराव उबाळे यांचा सत्कार उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेबांनी केला.

याप्रसंगी शिवसेनेचे नेते उमेश भाऊ जाधव तसेच पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेब व बाळापुर तालुका भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांनी यावेळेस परिसरातील उपस्थित असलेले सरपंच पोलीस पाटील व याप्रसंगी निंबा फाटा परिसरातील गावातील पोलीस पाटील व सरपंच आधी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: