Tuesday, November 5, 2024
Homeराज्यस्व. भोलाशंकरजी गुप्ता यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्तगरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य...

स्व. भोलाशंकरजी गुप्ता यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्तगरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप…

न्युज डेस्क – आज दिनांक 13 ऑगस्ट 2023 आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल स्व. रामदासभैया दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा मूर्तीजापुर जिल्हा अकोला या शाळेत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

स्व. भोलाशंकर हिरालाल गुप्ता यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना श्री संजय भोलाशंकरजी गुप्ता यांच्याकडून शाळेला शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षा मा. सौ नूतनताई हरीशभाऊ पिंपळे समाजसेविका या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री द्वारकाप्रसादजी दुबे माजी नगराध्यक्ष श्री संजय भोलाशंकरजी गुप्ता समाजसेवक श्री राहुल गुल्हाने समाजसेवक श्री कैलास महाजन समाजसेवक इब्राहिमभाई घाणीवाला माजी नगरसेवक श्री शालिग्राम यादव श्री गजानन बोर्ड श्री सुनील डायलकर श्री विशाल गुप्ता उपस्थित होते. शाळेमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले त्या कार्यक्रमासाठी श्री तिवारी सर श्री टाले सर श्री रोहित सोळंके स्वच्छता अभियानची पूर्ण टीम यांनी शाळेमध्ये येऊन वृक्षारोपण केले.

मा. सौ नूतनताई हरीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते सुध्दा वृक्षारोपण करण्यात आले तसेच हर घर तिरंगा स्वातंत्र्य अमृतोत्सव कार्यक्रमानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थी व पालकांना तिरंगा राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.

शाळेच्या वतीने श्री संजय भोलाशंकर जी गुप्ता यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल गणवेश वाटप केल्याबद्दल शाळेमार्फत त्यांचा विशेष सत्कार घेण्यात आला त्यांचे शाळेच्यावतीने आभार मानण्यात आले तसेच स्वच्छता समितीचे श्री तिवारी सर यांचा सुद्धा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप झोडपे सर श्री विशाल अंबडकार सर श्री दीपक हांडे श्रीमती अनिता देवके सौ सुषमा बाळापुरे कु. संजीवनी भगत शाळेतील विद्यार्थी सर्व पालक वर्ग उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: