रामटेक – राजू कापसे
दि.९ ऑगस्ट रोजी जागतिक मूलनिवासी दिनानिमित्त देवलापार विभागातील सावरा, कडबीखेडा, निमटोला, झिंझारिया, सिंदेवणी, कट्टा, रामटेकडी, महाजनटोला व देवलापार गावातील नागरिकांनी सामूहिक प्रयत्नाने जागतिक मूलनिवासी दिनाचे आयोजन केले होते.
मुकेशदादा पेंदाम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या बाईक रॅलीने, मुर्सेनाल नॅशनल गोंडवाना सोडुम विविध गावातून निमटोला ते कट्टा तसेच डोंगरताल किल्ल्यावर इंद्रधनुष्य ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहण करून निमटोलाकडून कट्ट्याच्या दिशेने पायी निघाले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना जागतीक आदीवाशी दिनाच्या शुभेच्छा देताना मान्यवरांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले यावेळी निमटोला येथे प्रामुख्याने हेमंतजी जैन, विठ्ठलजी जगणे, संदीप उईके, संदीप कुमरे, सुखलाल मडावी, जावेद सय्यद, मधुकरजी पेंदाम, रीमा सलामे, सुरेखा धुर्वे, रायवंती कुमरे, चव्हाण सर, अंकुश भलावी आदी उपस्थित होते.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांकडून रक्तदानही करण्यात आले व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोतीरावनजी खंडाते, संदीपजी कुमरे, मुकेशदादा पेंदाम, शिवराम वरठी, अमोल उईके, मोहन उईके, भूषण उईके, अमित उईके, तुषार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी वाडिवे, राजाबाबू परतेती, शिवम भलावी, मोहित धुर्वे, आदेश वरठी, जय भलावी, मंगेश नेताम, इंद्रजित वरठी तसेच सावरा, कडबीखेडा, निमटोला, झिंझारिया, सिंदेवणी, कट्टा, रामटेकडी, महाजनटोला व देवलापार येथील नागरिकांनी विशेष प्रयत्न केले.