शिक्षक बनणार एका अभूतपूर्व अनुभवाचे साक्षीदार
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांचा स्तुत्य उपक्रम
पातूर – निशांत गवई
आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहावा देशाला मजबूत शक्तिशाली आणि विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हातभार लागावा त्यासाठी नवनवीन शोध लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे या स्पर्धात्मक युगात समाजात पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे.
त्यात आपल्या जिल्ह्याचा विद्यार्थी मागे राहू नये त्यासाठी विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अध्यापनात अद्यावत राहावा या उदात्त हेतूने जिल्ह्याच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर ह्या सतत अग्रेसर राहिल्या आहेत याही वेळेस त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ द्वारा आयोजित या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यास दौऱ्यात जिल्ह्यातील अधिकारी, मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षकांसह एकूण 64 शिक्षक सहभागी झाले आहेत. हा अभ्यास दौरा 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यान असणार आहे.
या अभ्यास दौऱ्यामध्ये बिर्ला सायन्स सेंटर अँड प्लॅनेटोरियम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरला , सालारजंग म्युझियम, स्नो वर्ल्ड, भेट देऊन आपले विज्ञान व तंत्रज्ञान विषयक ज्ञान अद्यावत करून बदलत्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून देणार आहे.
सोबतच शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इन्स्पायर अवॉर्ड साठी नामांकन दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनांचा खाजाना सोबत घेऊन येनार आहेत व त्याचा फायदा देशाचे उज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा करून देणार आहेत अशी आशा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी अरविंद जाधव, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमुख टेकाडे व जिल्हा अध्यापक मंडळाचे अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाने व्यक्त केली आहे.